कोल्हापूर: गुजरीतील ५ आटणी दुकानात चोरी; सोने, चांदी लंपास | पुढारी

कोल्हापूर: गुजरीतील ५ आटणी दुकानात चोरी; सोने, चांदी लंपास

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गुजरी, कासार गल्लीमध्ये बंगाली कारागीरांच्या दुकानांची कुलपे उचकटून ६ ते ७ तोळे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदी असा ऐवज चोरट्याने लंपास केला. जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

कासार गल्लीत स्थानिक सोने कारागिरांसह बंगाली कारागिरांची आटणीची दुकाने आहेत. सोन्याचे दागिने, बिस्किटे, चांदीचे ऐवज बनविण्याचे काम येथे चालते.

एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये बंगाली कारागीरांची पाच दुकाने आहेत. शुक्रवारी (दि.२९) रात्री ही दुकाने बंद करून कामगार गेले होते. मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास पांढरे कपडे परिधान केलेला संशयित व्यक्ती तिथे आला. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्याने सुमारे तासभर रेकी करून १ वाजण्याच्या सुमारास बेसमेंटमध्ये प्रवेश केला. येथील चार दुकानांची कुलपे तोडून ऐवज चोरला. तसेच एक साहित्य विक्रीचे दुकानही फोडले.

शनिवारी सकाळी कारागीर दुकान उघडण्यासाठी आलेल्या कामगारांच्या निदर्शनास ही बाब आली. या घटनेबाबत समजताच जुना राजवाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी, प्रशिक्षणाथी पोलीस उपअधीक्षक रविंद्र भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा :

Back to top button