Rana Suryavanshi Attack Case: राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणातील सुपारीची साखळी उघड; मुख्य सूत्रधाराचे गूढ कायम

बारामतीतील हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत सात नावे तपासात निष्पन्न; ज्ञानेश्वर साळुंखेच्या शोधावर पोलिसांचा भर, पाच आरोपींना २८ ऑक्टोबरपर्यंत कोठडी
Police Investigation
Police InvestigationPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला प्रकरणात सुपारीच्या पैशांची साखळी तपासातून समोर आली आहे. हल्लेखोरांपासून सुपारी देणाऱ्यांपर्यंतचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असले, तरी हल्ल्याचा आदेश नेमका कोणी दिला आणि त्यामागचे कारण काय, याचे गूढ अद्याप कायम आहे. या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या ज्ञानेश्वर साळुंखे याचा शोध सुरू असून, तो सापडल्यानंतरच हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार आणि पैशांच्या व्यवहाराचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

Police Investigation
Kashibai Navale Hospital Salary: काशीबाई नवले रुग्णालयातील डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे नऊ महिन्यांचे वेतन थकीत; दिवाळीपूर्वी आंदोलन

दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास बारामतीत सूर्यवंशी यांच्यावर सत्तूरने हल्ला केला होता. या प्रकरणात पोलिसांनी हल्ल्यासाठी वापरलेला सत्तूर जप्त केला आहे. तपासात एका अल्पवयीन मुलासह पार्थ अवथळे याचा सहभाग समोर आला. या दोघांना ज्ञानदेव शिंदे याने सुपारी दिल्याची माहिती तपासात पुढे आली. शिंदे याला स्वप्निल कांबळे आणि निनाद महाडिक यांनी हल्ला करण्यास सांगून पैसे दिल्याचे समोर आले. मात्र, कांबळे आणि महाडिक यांना हे पैसे ज्ञानेश्वर साळुंखे आणि चैतन्य बाबर यांच्या सांगण्यावरून दिल्याची माहिती आहे. आतापर्यंतच्‍या ग्रामीण पोलिसांच्‍या तपासात सात नावे निष्पन्‍न झाली असून पुढील तीन दिवसांत प्रकरणाचा पूर्णपणे उलगडा होईल, असा ठाम विश्वास ग्रामीण पोलिसांकडून दाखविला जात आहे.

Police Investigation
Traditional Diwali Brooms: दिवाळीसाठी लोणी-धामणीत पारंपरिक केरसुण्यांची लगबग; २० हजार झाडूंची निर्मिती

बाबरच्या चौकशीत साळुंखेचे नाव

या प्रकरणात पोलिसांनी चैतन्य बाबर याला अटक केली आहे. चौकशीदरम्यान बाबर याने या हल्ल्याबाबत आपल्याला फारशी माहिती नसल्याचे सांगितल्याची माहिती आहे. ज्ञानेश्वर साळुंखे याला या प्रकरणाची अधिक माहिती असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितल्याचे समजते. त्यामुळे साळुंखे याचा शोध घेऊन त्याची चौकशी करणे पोलिसांसाठी महत्त्वाचे ठरले आहे.

Police Investigation
Rahu DJ Noise Case: राहूत डीजेच्या कर्णकर्कश आवाजात गोंधळ; ३८ जणांवर यवत पोलिसांकडून गुन्हा दाखल

हल्ल्याचा आदेश कोणी दिला?

ज्ञानदेव शिंदे याने हर्षवर्धन झोल यांच्या सांगण्यावरून हल्ला केल्याचा दावा केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या दाव्याला अद्याप पोलिस तपासातून पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे हल्ल्याचा आदेश कोणी दिला, सुपारीची रक्कम कोणाकडून कोणाकडे पोहोचली आणि सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्यामागचे नेमके कारण काय, या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. साळुंखे याला ताब्यात घेतल्यानंतर पैशांच्या व्यवहारातील उर्वरित दुवे आणि हल्ल्यामागील कथित सूत्रधाराबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासाची दिशा साळुंखेच्या शोधावर केंद्रित झाली आहे.

Police Investigation
Pune Property Tax Self Assessment: पुण्यात मिळकतकरासाठी ‘सेल्फ असेसमेंट’ प्रणाली आणा; विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांची मागणी

राणा सूर्यवंशी कथित हल्ल्याचे गूढ कायम

बारामतीत आठ दिवसांपूर्वी घडलेल्या राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या कथित घटनेचे गूढ अद्याप कायम आहे. पोलिसांनी यावर माैन बाळगल्याने या प्रकरणाबाबत विविध तर्कवितर्क-चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीचे वकील ॲड. महेश देवकाते यांनी तपास यंत्रणांना योग्य वेळ दिला असूनही, मूळ तक्रारदाराचा शोध लागत नसल्याने या अनुषंगाने न्यायालयाने पोलिस यंत्रणेला योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी सोमवारी(दि.२६) न्यायालयात केली. दरम्यान, या प्रकरणात फुलांच्या दुकानाजवळ उभे असलेल्या काही आरोपींचे वकीलपत्र माझ्याकडे आहे. आरोपींनी आपल्याकडून गोळीबारासह कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे घटनेचे नेमके स्वरूप, आरोपींची भूमिका आणि उपलब्ध पुरावे यांची चाैकशी करण्याची मागणी त्यांनी केली. या गुन्ह्यात एकूण पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने सर्व आरोपींना २८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news