Rajgurunagar Election Violence: राजगुरूनगरमध्ये पैसे वाटपाच्या संशयातुन मारहाण

नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिवाजी मांदळे आणि 7 साथीदारांवर गुन्हा दाखल; बेदम मारहाणीमुळे खेड पोलीस स्टेशनला धाव
Rajgurunagar Election Violence
Rajgurunagar Election ViolencePudhari
Published on
Updated on

खेड : राजगुरूनगर , (ता. खेड) नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळजनक घटना घडली आहे.

Rajgurunagar Election Violence
Rahul Gandhi: न्यायालयात मोठा ट्विस्ट! सावरकर खटल्यात राहुल गांधींविरुद्ध लावलेली सीडी निघाली रिकामी; नेमकं काय घडलं?

नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिवाजी मांदळे यांच्यासह त्यांच्या ७ साथीदारांनी दोन तरुणांना “मतदारांना पैशाची बॅग वाटताना पळून का गेला?” अशा संशयातून बेदम मारहाण केल्याचा आरोप झाला आहे. याप्रकरणी खेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

Rajgurunagar Election Violence
Pune Grand Challenge Tour: 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' आंतरराष्ट्रीय सायकलिंगसाठी प्रशासन सज्ज; आयुक्तांकडून कठोर नियोजनाचे निर्देश

शहराचे माजी नगराध्यक्ष असलेले शिवाजी मांदळे हे भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक ६ मधून नगरसेवक आणि शहरातून थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत.फिर्यादी साई विलास पिंगळे यांनी तक्रार दिली आहे.

Rajgurunagar Election Violence
Mohan Joshi Pune Congress: १९९९ मधील फुटीनंतरही महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा; ‘काँग्रेस आपल्या दारी’ ठरली प्रभावी योजना

संबंधित युवक पैसे वाटप करताना आढळुन आले. कार्यकर्त्यांनी पकडायचा प्रयत्न केला असता ते पळुन चालले होते. कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली त्यांना आवरण्याचा मी प्रयत्न केला.त्यांनी पोलिसात तक्रार दिली, त्यात रात्री साडेअकरा वाजता प्लॉट पाहायला आल्याचे म्हटले आहे. पोलीस सखोल चौकशी करून योग्य न्याय देतील.

शिवाजी मांदळे, माजी नगराध्यक्ष, राजगुरुनगर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news