Maharashtra LPG Cylinder Shortage: राज्यात एलपीजी सिलिंडर टंचाई; प्राधान्याने पुरवठ्याचे आदेश

रुग्णालये, शाळा, स्मशानभूमी व वृद्धाश्रमांना 100% गॅस देण्याचे निर्देश; हॉटेल्स व उद्योगांवर परिणाम
LPG Gas
LPG GasPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे आणि राज्यातील इतर शहरांमध्ये गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे शिल्लक असलेले व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर रुग्णालये, शैक्षणिक संस्था, स्मशानभूमी, वृद्धाश्रम, तसेच हॉटेल्सना पुरवण्याचे आदेश राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

LPG Gas
SPPU Gas Shortage Mess: गॅसटंचाईचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खानावळींवर परिणाम

वास्तवात आखाती युद्धामुळे गॅस कंपन्यांकडून एजन्सींना होणारा गॅसपुरवठा थांबवण्यात आला आहे. त्यामुळे एजन्सीजमध्ये सिलिंडर उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत शिल्लक सिलिंडर कसे मिळणार आणि गॅसपुरवठा कसा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LPG Gas
Pune Gas Shortage Rumours: अफवांमुळे पुण्यात गॅस बुकिंगचा भडका

अन्न व पुरवठा खात्याच्या वतीने 13 मार्च रोजी काढलेल्या पत्राद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार रुग्णालये, शाळा, स्मशानभूमी, वृद्धाश्रम आणि अनाथालयांना 100 टक्के गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचे आदेश आहेत. उपाहारगृह, संरक्षण क्षेत्र, शासकीय व सार्वजनिक क्षेत्र, रेल्वे यांना 70 टक्के, तर औषध, उद्योग आणि मत्स्यपालन विभागाला 50 टक्के शिल्लक गॅस उपलब्ध करावा, अशी सूचना आहे.

LPG Gas
Maharashtra Divyang Sakshamikaran Department: दिव्यांग कल्याण विभागाचे ‘दिव्यांग सक्षमीकरण विभाग’ असे नामांतर

पुणे जिल्ह्यात किती व्यावसायिक गॅस सिलिंडर शिल्लक आहेत का, याची माहिती मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे विचारणा केली असता संपर्क होऊ शकला नाही. मात्र, व्यावसायिक गॅसचा तुटवडा विशेषत: हॉटेल्स, रेस्टॉरंट्‌‍स आणि रुग्णालयांसाठी गंभीर परिस्थिती निर्माण करीत आहे. हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले, की गरजेनुसार गॅस न मिळाल्याने ग््रााहकांना सेवा देणे कठीण झाले आहे.

LPG Gas
Pune Sub Registrar Vacant: पुण्यात दुय्यम निबंधकांची पदे रिक्त

या परिस्थितीमुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. सरकारच्या आदेशानुसार, गॅस एजन्सींनी प्राधान्यक्रम ठरवून रुग्णालये, शाळा, वृद्धाश्रम आणि हॉटेल्ससह महत्त्वाच्या संस्थांना शिल्लक गॅस उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, गॅस कंपन्यांनी पुरवठा थांबविल्यामुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. यातून सरकार कशा प्रकारे मार्ग काढणार, हे पाहावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news