Rahul Gandhi Savarkar Defamation Case: राहुल गांधींविरोधातील सावरकर बदनामी खटल्यात फडणीसांचा हस्तक्षेप अर्ज फेटाळला; २० हजारांचा दंड

सावरकरांचे कुटुंबीय अथवा निकटवर्तीय नसल्याने हस्तक्षेपाचा अधिकार नाही; पुणे न्यायालयाचा निर्णय
Pune District Court
Pune District CourtPudhari
Published on
Updated on

पुणे: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर बदनामी खटल्यात पक्षकार म्हणून सहभागी होण्यासाठी प्रा. डॉ. पंकज फडणीस यांनी केलेला हस्तक्षेप अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला. फडणीस हे सावरकर यांचे कुटुंबीय अथवा निकटवर्तीय नातेवाईक नसल्याने त्यांना या खटल्यात हस्तक्षेप करण्याचा कायदेशीर अधिकार नाही, असे विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या न्यायालयाने स्पष्ट केले.

Pune District Court
Pune IIT Admission Fraud Gang: आयआयटी प्रवेशाच्या आमिषाने पालकांची लाखोंची फसवणूक; पुण्यातून टोळीतील १० जणांना अटक

दरम्यान, सात्यकी सावरकर यांची उलटतपासणी सुरू असताना हस्तक्षेप अर्जामुळे न्यायालयाचा मौल्यवान वेळ खर्च झाल्याचे नमूद करत न्यायालयाने त्यांना २० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. ही रक्कम पुढील तारखेपूर्वी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Pune District Court
PMPML New CNG Buses: पुणेकरांसाठी मोठी गुड न्यूज; पीएमपीच्या ताफ्यात वर्षअखेरीस ५०० नव्या सीएनजी बस

शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सात्त्यकी सावरकर विरुद्ध राहुल गांधी हा खासगी फौजदारी खटला सुरू आहे. या खटल्यात आवश्यक पक्षकार म्हणून सहभागी करून घेण्याची मागणी फडणीस यांनी केली होती.

Pune District Court
Underwater Cable Security: समुद्रतळावरील केबल्सच्या सुरक्षेसाठी भारताने युद्धतंत्र विकसित करावे; माजी नौदलप्रमुखांचे मत

सावरकर यांच्याविषयी २५ वर्षांहून अधिक काळ संशोधन केले असून, त्यासंदर्भात तीन पुस्तके लिहिल्याचे तसेच सावरकर यांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले होते.

Pune District Court
Pune APMC Inquiry: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची फेरचौकशी; जुन्या अहवालावर तक्रारदारांचे आक्षेप

पक्षकार केल्यास खटल्याला विलंब होऊन त्याची मूळ दिशा भरकटण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तर, राहुल गांधी यांच्या वतीनेही ॲड. मिलिंद पवार यांच्याकडून अर्जाला विरोध करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news