Pune Rabies Free: रेबिजमुक्त पुण्याच्या दिशेने महापालिकेची वाटचाल; तीन वर्षांत एकही मानवी मृत्यू नाही

दोन वर्षांत ९५ हजार ५५० श्वानांचे लसीकरण; २०३० पर्यंत रेबिज उच्चाटनाचे उद्दिष्ट, निवारा केंद्रांचीही उभारणी
Rabies Vaccine
Rabies VaccinePudhari
Published on: 
Updated on: 

विनय पुराणिक

पुणे: श्वानांमार्फत पसरणाऱ्या रेबिजला प्रतिबंध करण्यासाठी पुणे महापालिकेने लसीकरण मोहिमेवर भर दिला आहे. शहरात गेल्या तीन वर्षांत रेबिजमुळे एकही मानवी मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली. भटक्या श्वानांसह पाळीव श्वानांचे लसीकरण, नोंदणी आणि नियमित देखरेख, अशा उपाययोजनांमुळे रेबिजमुक्त पुण्याच्या दिशेने महापालिकेची वाटचाल सुरू असल्याचा दावाही महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

Rabies Vaccine
Viral Infection Detection | डेंग्यू, चिकुनगुनिया, झिकाचे एकाच वेळी निदान शक्य!

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय आणि पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर डॉग मेडिएटेड रेबिज एलिमिनेशन’ (एनएपीआरई) हा राष्ट्रीय कृती आराखडा राबविण्यात येत आहे. २०३० पर्यंत श्वानांमार्फत होणाऱ्या रेबिजचे उच्चाटन करण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागाने शहरातील श्वानांच्या लसीकरणाची मोहीम अधिक प्रभावी केली आहे.

Rabies Vaccine
Bhatghar Dam: भाटघर धरणाला अतिक्रमणांचा विळखा; बेकायदेशीर बांधकामे, हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि वीजखांबांमुळे धोका

विशेषत: २०२३ मधील पशुगणनेनुसार पुणे शहरात सुमारे एक लाख ७९ हजार ९४० भटके श्वान होते. या श्वानांचे टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्याबरोबरच पाळीव श्वानांची नोंदणी करण्यावरही महापालिकेने भर दिला असून, यंदाच्या पशुगणनेची आकडेवारी महापालिकेला प्राप्त झालेला नाही. मात्र, महापालिकेने पाळीव श्वानांचे लसीकरण ऑनलाइन नोंदणीनुसार सुरू ठेवले आहे, तर भटक्या श्वानांचे लसीकरण वॉर्डनिहाय सुरू आहे.

Rabies Vaccine
Shirkai Devi Temple: शिरकाईदेवी देवस्थानाला 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षात ५९ हजार ९१८ श्वानांचे लसीकरण करण्यात आले होते, तर २०२६-२७ या चालू आर्थिक वर्षातीस सप्टेंबर महिन्यापर्यंत ३५ हजार ६३२ श्वानांना रेबिजप्रतिबंधक (पीईपी) लस देण्यात आली असून, दोन वर्षांतील लसीकरणाचा एकूण आकडा ९५ हजार ५५० पोहचला आहे.

निवारा केंद्राबाबत जोरदार हालचाली

शहराच्या हद्दीत बाणेर, मुंढवा आणि नायडू रुग्णालय येथे २०० श्वानांची क्षमता असलेले श्वान निवारा केंद्र (शेल्टर) कार्यरत असून, येत्या दोन महिन्यांत भूगाव आणि शिंदेवाडी याथील निवारा केंद्रांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दोन महिन्यांत हे शेल्टर सुरू होणार आहे. या ठिकाणी १५० श्वानांचे व्यवस्थापन क्षमता होणार असून, याबाबतही कार्यवाही सुरू असल्याचे नमूद करण्यात आले.

Rabies Vaccine
Shirsai Lift Irrigation Scheme: शिरसाई उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन सुरू; १६० दशलक्ष घनफूट पाणी मिळणार

प्रतिबंधात्मक उपचारांमुळे सुस्थितीत

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत ३६ हजार १९१ नागरिकांना श्वान चावल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये बहुतांश घटनांमध्ये श्वानाचा नख लागला, ओरबाडले, दात लागला अशा घटनांची नोंद असली; तरी संबंधितांवर प्रतिबंधात्मक उपचार करण्यात आले असून, सुस्थितीत असल्याचेही महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

रेबिज हा प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे टाळता येणारा गंभीर आजार आहे. त्यामुळे श्वानांचे व्यापक लसीकरण, नागरिकांमध्ये जनजागृती आणि पाळीव श्वानांच्या मालकांचा सहभाग, या बाबींना महत्त्व आहे. त्यानुसार इतर महापालिकांच्या तुलनेत पुणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या तीन वर्षांत एकही रेबिज मृत्यूची नोंद झाली नसून रेबिजमुक्त पुणे महापालिका राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

डॉ. सारिका फुंडे, पशुवैद्यकीय अधिकारी, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.