Bhatghar Dam: भाटघर धरणाला अतिक्रमणांचा विळखा; बेकायदेशीर बांधकामे, हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि वीजखांबांमुळे धोका

भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिक्रमणे आणि बसरापूर येथे पाण्यात वीजखांब उभारल्याचा प्रवीण जगदाळे यांचा आरोप. कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
Bhatghar Dam
Bhatghar DamPudhari
Published on: 
Updated on: 

भोर: भाटघर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात तसेच बुडीत क्षेत्राच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर अतिक्रमणे करून पक्की व कच्ची बांधकामे, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उभारण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जगदाळे यांनी केला आहे.

बसरापूर येथे धरणाच्या पाण्यात बेकायदेशीरपणे वीजखांब उभारून वीजजोडणीचे काम करण्यात आले आहे.

या प्रकारामुळे धरणाचे पर्यावरण, पाणीसाठा तसेच नागरिक, जनावरे आणि वन्यजीवांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी भोरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Bhatghar Dam
Vaishnavi Hagawane Case: व्हॉट्सॲप संभाषणात तो उल्लेख नाही; बचावपक्षाचा युक्तिवाद काय, जामिनावरील सुनावणीत काय घडले?

बसरापूर गावच्या हद्दीत भाटघर धरणाच्या पाण्यात बेकायदेशीरपणे वीजखांब आणि डीपी उभारण्यात आली आहे. धरणातील पाण्याची पातळी वाढल्यानंतर विजेचा प्रवाह पाण्यात उतरल्यास नागरिक आणि जनावरांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत तक्रारी करूनही महावितरण कंपनीकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे जगदाळे यांनी म्हटले आहे.

Bhatghar Dam
Shirsai Lift Irrigation Scheme: शिरसाई उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन सुरू; १६० दशलक्ष घनफूट पाणी मिळणार

याशिवाय, भाटघर धरणाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या रस्त्यालगत करंदी, कांबरे, वाढाणे, पसुरे, राजघर, वेळवंड, कुरुजी, निवगुनी आणि बसरापूरसह अनेक गावांच्या हद्दीत धरणाच्या पाण्यालगत अतिक्रमणे करण्यात आली आहेत.

शासकीय आणि जलसंपदा विभागाच्या मालकीच्या जमिनींवर खासगी हितसंबंधांसाठी बेकायदेशीरपणे ताबा मिळवून हॉटेल्स, रिसॉर्ट्स तसेच कच्ची व पक्की बांधकामे उभारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या अतिक्रमणांमुळे पाण्याची पातळी वाढल्यानंतर विजेचा प्रवाह पाण्यात उतरून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच जलसंपदा विभाग आणि महावितरणच्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असून, परिसरातील नागरिक, जनावरे आणि वन्यजीवांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन महसूल आणि जलसंपदा विभागामार्फत संबंधित गावांच्या शिवारात प्रत्यक्ष पाहणी करावी. धरणाच्या पाण्यालगत बेकायदेशीर अतिक्रमणे करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर कडक कायदेशीर कारवाई करावी तसेच अनधिकृत बांधकामे आणि वीजखांब तातडीने हटवावेत, अशी मागणी जगदाळे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.