Puranadar Zp Election Results 2026: पुरंदरमध्ये राष्ट्रवादी-भाजपने गड राखले, पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

गराडे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली अमोल झेंडे यांनी २१,७६८ मते मिळवत दणदणीत विजय मिळविला
Purndar Taluka Panchayat Samiti Election Result 2026
Purndar Taluka Panchayat Samiti Election Result 2026Pudhari
Published on
Updated on

सासवड : पुरंदरमध्ये जिल्हा परिषद गटात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने आपले गड कायम राखले. दोन्ही पक्षांना प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले. पंचायत समितीत राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या. भाजप व शिवसेनेने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या.

Purndar Taluka Panchayat Samiti Election Result 2026
Purandar Election Campaign: पुरंदरमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम; ढाब्यांपासून बैठकींपर्यंत धामधूम

गराडे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली अमोल झेंडे यांनी २१,७६८ मते मिळवत दणदणीत विजय मिळविला. विरोधातील भाजपच्या दिव्या संदीप जगदाळे यांना ७,७५० मते मिळाली. झेंडे यांनी तब्बल १४,०१८ मतांनी विजय नोंदविला.

Purndar Taluka Panchayat Samiti Election Result 2026
Kolhapur ZP Election | शिरोळ तालुक्यावर आ. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचे निर्विवाद वर्चस्व

बेलसर जिल्हा परिषद गटात भाजपचे अजय कैलास इंगळे यांनी ७,५९७ मते घेत विजय मिळविला. काँग्रेसचे दत्ता झुरुंगे यांना ६,१५३ मते मिळाली. इंगळे यांनी १,४४४ मतांनी विजय मिळविला.

Purndar Taluka Panchayat Samiti Election Result 2026
Shirur Rural ZP Election: क्रॉस वोटिंगने धाकधूक वाढवली!

वीर जिल्हा परिषद गटात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. भाजपचे हरिभाऊ लोळे यांनी ११,५९१ मते मिळवत विजय मिळविला, तर शिवसेनेचे समीर जाधव यांना ११,०४१ मते मिळाली. लोळे यांनी केवळ ५५० मतांनी विजय मिळविला.

Purndar Taluka Panchayat Samiti Election Result 2026
Pune ZP Election Result Live: पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता; किती जागा जिंकल्या?

निरा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे यांनी १३,४४९ मते मिळवत बाजी मारली, तर शिवसेनेच्या भारती अतुल म्हस्के यांना ७,७८५ मते मिळाली. दुर्गाडे यांनी ५,६६४ मतांची भक्कम आघाडी घेत विजय मिळविला.

Purndar Taluka Panchayat Samiti Election Result 2026
Sambhajinagar ZP Result 2026: छत्रपती संभाजीनगमध्ये भाजपची सरशी, शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर

दरम्यान, पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले. वीर पंचायत समिती गणातून शिवसेनेचे प्रवीण बाळासाहेब जगताप यांनी ५,९२१ मते मिळवत विजय मिळविला. त्यांचे प्रतिस्पर्धी सुधीर शिवाजीराव धुमाळ यांना ५,७६२ मते मिळाली. जगताप यांनी १५९ मतांची आघाडी घेतली. तसेच, भिवडी पंचायत समिती गणात भाजपच्या सायली मनोज शिंदे यांनी ६,७६६ मते मिळवत विजय मिळविला. त्यांच्या प्रतिस्पर्धी पूजा सागर मोकाशी यांना ५,९१२ मते मिळाली. शिंदे यांनी ८५४ मतांची आघाडी घेतली.

Purndar Taluka Panchayat Samiti Election Result 2026
Satara Sangli Solapur ZP Result 2026: सोलापुरात भाजप, साताऱ्यात अजित पवार गटाची सरशी; सांगली कोणाकडे? पाहा संपूर्ण निकाल

दिवे पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित भाऊसाहेब झेंडे यांनी १३,४४४ मते मिळवत मोठा विजय नोंदविला. शिवसेनेचे बाळासाहेब दगडू मगर यांना केवळ ३,२५० मते मिळाली. झेंडे यांनी १०,१९४ मतांची विक्रमी आघाडी घेतली. गराडे पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या अर्चना ज्ञानेश्वर कटके यांनी ८,०३० मते मिळवून विजय मिळविला. शिवसेनेच्या सुप्रिया विशाल रावडे यांना ४,७९१ मते मिळाली. कटके यांनी ३,२३९ मतांची आघाडी घेतली.

Purndar Taluka Panchayat Samiti Election Result 2026
Solapur ZP Election Result: मिनी मंत्रालयावर भाजप की आघाडी

माळशिरस पंचायत समिती गणात भाजपचे माऊली आप्पा यादव यांनी ४,५८५ मतांनी विजय मिळविला. शिवसेनेचे शरद बाळासाहेब यादव यांना ३,२४० मते मिळाली. यादव यांनी १,३४५ मतांची आघाडी मिळवली. बेलसर पंचायत समिती गणात शिवसेनेचे माणिक बाळासो निंबाळकर यांनी ४,७८३ मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश कृष्णा जगताप ४,२५७ यांचा ५२६ मतांनी पराभव केला.

Purndar Taluka Panchayat Samiti Election Result 2026
Maharashtra ZP Results 2026: जिल्हा परिषद निकालांचे पहिले कल हाती; राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

कोळविहिरे पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्मिता संतोष निगडे यांनी ५,७०८ मते मिळवत शिवसेनेच्या शीतल सतीश साळुंखे यांचा १,०५७ मतांनी पराभव केला. साळुंखे यांना ४,६५१ मते मिळाली. निरा पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोनिका स्वप्निल कांबळे यांनी ६,१०९ मते मिळवत विजय मिळविला. भाजपच्या वंदना बाळासाहेब भोसले यांना ३,१४१ मते मिळाली. कांबळे यांचा २,१६८ मतांनी विजय झाला.

Purndar Taluka Panchayat Samiti Election Result 2026
Panvel ZP Election Clash | भाजप कार्यकर्त्याने पोलिस अधिकाऱ्याची पकडली गचंडी; पनवेल मतमोजणी केंद्रा बाहेर तणाव

या निवडणुकीत पंचायत समितीस्तरावर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले. जिल्हा परिषदेत भाजपने महत्त्वाच्या गटांवर विजय मिळवत प्रभाव कायम ठेवला. शिवसेनेला काही गणांमध्ये यश मिळाले असले, तरी अनेक ठिकाणी कमी फरकाने पराभव स्वीकारावा लागला. हा निकाल पुरंदर तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news