Sambhajinagar ZP Result 2026: छत्रपती संभाजीनगमध्ये भाजपची सरशी, शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर

Marathwada ZP Election Result: मराठवाड्यातील जिल्हा परिषदेत सत्तेच्या चाव्या भाजपकडेच
Sambhajinagar ZP Result 2026
Sambhajinagar ZP Result 2026 LIVEpudhari photo
Published on
Updated on

Sambhajinagar ZP Result 2026: मराठवाड्यातील महत्वाची जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर जिल्हापरिषदेवर भाजपनं आपला झेंडा रोवला आहे. भाजपने ६२ पैकी २३ जागा भाजपने जिंकल्या आहेत तर शिवसेना शिंदे गटाने २० जागांवर यश मिळवलं आहे.

लातूरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटें की टक्कर पहायला मिळाली असून इथं ५९ पैकी २३ जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष झाला आहे. मात्र भाजपनं १८ तर राष्ट्रवादी काँग्रेसने १२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे सत्तेच्या चाव्या महायुतीकडेच असण्याची शक्यता आहे.

परभणीत देखील भाजप २४ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं १४ जागा जिंकत सत्ता राखली आहे. तर धाराशिमध्ये भाजपने १८ शिंदे सेनाने १५ जागा जिंकल्या आहेत.

भाजपची मोठी सरशी

भाजप - २३

शिवसेना शिंदे गट - २०

राष्ट्रवादी काँग्रेस - ४

काँग्रेस - १

शिवसेना उबाठा - ९

राष्ट्रवादी काँग्रेस शप - १

इतर - ५

लातूरमध्ये काँग्रेसला धक्का; भाजपची मुसंडी

भाजप - १५

शिवसेना शिंदे - २

राष्ट्रवादी अप - ६

काँग्रेस - १२

राष्ट्रवादी शप - १

इतर - ३

छत्रपती संभाजी नगरमध्ये भाजपनं शिंदे सेनेला टाकलं मागं - 63

भाजप - १७

शिवसेना (शिंदे) - १५

राष्ट्रवादी काँग्रेस अप - ४

काँग्रेस - २

शिवसेना उबाठा - ६

राष्ट्रवादी काँग्रेस - १

इतर - ५

संभाजी नगर जिल्हा परिषद 

संभाजी नगर जिल्हा परिषदेत वडगाव कोल्हाटी या गटातील सचिन गरड एका मताने विजयी झाले आहेत. विरोधकांची फेर मतमोजणीची मागणी केली आहे. सचिन गरड हे अपक्ष उमेदवार आहेत.

जिल्हा परिषदेचे विजयी उमेदवार

झरी जिल्हा परिषद गटात भाजपचे दिलीप प्रभाकरराव देशमुख विजयी झाले.

टाकळी बोबडे जि.प. गटात शिंदे सेनेच्या सुचिता आनंदराव भरोसे यांनी बाजी मारली.

पिंगळी जि.प. गटात शिंदे सेनेच्या पूजा अनिल सावंत विजयी झाल्या.

पेडगाव जि.प. गटात काँग्रेसचे जितेंद्र गोपाल देशमुख यांनी विजय संपादन केला.

टाकळी कुंभकर्ण जि.प. गटात उद्धव सेनेच्या प्रतीक्षा प्रभुलाल जयस्वाल विजयी झाल्या.

दैठणा जि.प. गटात काँग्रेसच्या ज्योत्स्ना गणेश घाडगे यांनी यश मिळवले.

पोखरणी जि.प. गटात भाजपच्या ऐश्वर्या अजय चव्हाण विजयी झाल्या.

लोहगाव जि.प. गटात काँग्रेसचे अजित अनिलराव वरपुडकर यांनी विजय मिळवला.

जांब जि.प. गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे संग्राम प्रतापराव जामकर विजयी झाले.

सिंगणापूर जि.प. गटात उद्धव सेनेचे पांडुरंग बालासाहेब खिल्लारे यांनी बाजी मारली.

लातूर जिल्हा परिषद - ५८

भाजप - ४

शिवसेना शिंदे गट - ०

राष्ट्रवादी अप - १

काँग्रेस - ५

शिवसेना उबाठा - ०

राष्ट्रवादी शप - १

इतर - २

छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद - ६२

छत्रपती संभाजी नगरमध्ये सध्या भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पत्र सध्या समान १५ जागांवर आहेत. तर राष्ट्रवादी ४ आणि काँग्रेस २ जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना उबाठा ६ जागांवर आघाडीवर आहे.

धाराशीवमध्ये वंचितनं खातं उघडलं

धाराशीवमधील भूम पखरूड गणात वंचितच्या प्रियांका राणबागुल विजयी झाल्या आहेत.

संभाजीनगर जिल्ह्यात भाजपच सध्या आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष

63 / 32

भाजप : 12

शिवसेना : 8

शिवसेना UBT: 6

NCP : 5

काँग्रेस : 00

वंचित : 00

MIM: 00

अपक्ष :1

छत्रपती संभाजीनगर जि.प. ब्रेकिंग..

मोठी अपडेट माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांचा पुत्र साडेचारशे चौथ्या मताने पिछाडीवर.

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील बोरसर गटातून त्यांनी निवडणूक लढवली होती.

शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी लढत या गटामध्ये झाली होती अन अखेर माजी आमदार भाऊसाहेब चिकटवकरांचा मुलगा पिछाडीवर असून, भाकरी गटाचा उमेदवार मनोज गायके हा आघाडीवर आहे.

धाराशीव जिल्हा परिषद 

धाराशीवमध्ये भाजप सात, शिवसेना ६ तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी ४ जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना ठाकरे गट देखील ४ जागांवर आघाडीवर आहे.

छत्रपती संभाजीनगर.. पंचायत समिती आघाडी

एकूण ९ पंचायत समिती

१)छत्रपती संभाजीनगर एकूण (२०)

भाजप : 7

शिवसेना : 3

शिवसेना UBT: 1

NCP :

२)पैठण तालुका (१८)

भाजप : 2

शिवसेना : 9

शिवसेना UBT: 1

NCP : 0

३)गंगापूर तालुका (१८)

भाजप : 6

शिवसेना : 4

शिवसेना UBT: 1

NCP : 2

४)वैजापूर तालुका (१६)

भाजप : 4

शिवसेना : 7

शिवसेना UBT: 2

NCP : 0

५)कन्नड तालुका (१६)

भाजप : 4

शिवसेना : 5

शिवसेना UBT: 2

NCP : 2

६)खुलताबाद तालुका (६)

भाजप : 3

शिवसेना : 2

शिवसेना UBT: 1

NCP :

७)फुलंब्री तालुका (८) :

भाजप : 4

शिवसेना : 2

शिवसेना UBT: 1

NCP :

८)सिल्लोड तालुका (१८)

भाजप : 3

शिवसेना : 9

शिवसेना UBT: 2,

NCP :

९)सोयगाव तालुका (६) :

भाजप : 1

शिवसेना : 3

शिवसेना UBT: 1

NCP :

परभणीत ठाकरे वाढून 

परभणी जिल्हा परिषदेत शिवसेना ठाकरे गट ५ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप आणि काँग्रेस हे प्रत्येकी ३ जागांवर आघाडीवर आहेत.

धाराशीवमध्ये भाजप आघाडीवर

धाराशीवमध्ये भाजप ५ जागांवर आघाडीवर आहे. तर शिंदेंची शिवसेना ३ जागांवर आघाडीवर आहे. ठाकरेंची शिवसेना ३ जागांवर आघाडीवर आहे.

संभाजीनगर मध्ये भाजप आघाडीवर 

छत्रपती संभाजी नगरमधील जिल्हा परिषदेच्या ६ जागांवर भाजप आघाडीवर आहे तर शिंदे गट ४ जागांवर आघाडीवर आहे. ठाकरे २ तर राष्ट्रवादी २ जागांवर आघाडीवर आहे.

बबनराव लोणीकर यांची कन्या आघाडीवर 

संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक मतमोजणीत बबनराव लोणीकर यांची कन्या आघाडीवर

लातुरात मनसेचा उमेदवार विजयी

लातूरमधील रेणापूर पंचायत समिती मधील पाणगाव गणात मनसेचा उमेदवार विजयी झाला आहे.

संभाजीनगर वैजापूर तालुक्यात ठाकरे गट आघाडीवर

संभाजी नगरमधील वैजापूर तालुक्यात ठाकरे गटाचे ४ उमेदवार आघाडीवर आहे.

जिल्हा परिषदेत मनसे आघाडीवर 

लातूरमध्ये मनसेचा एक उमेदवार हा आघाडीवर आहे.

सांगळे धाराशीवमधून विजयी 

धाराशीवमधील सांगळे यांनी विजय मिळवला आहे.

संभाजीनगरमध्ये भाजप आघाडीवर 

छत्रपती संभाजी नगरमध्ये भाजप ४ जागांवर आघाडवर आहे तर शिंदेची शिवसेना २ जागांवर आघाडीवर आहे. ठाकरेंची शिवसेना एका जागेवर आघाडीवर आहे.

मतदान केंद्राबाहेर गोंधळ

धाराशीव मतमोजणी केंद्राबाहेर गोंधळ झाल्याची माहिती समोर येत आहे.

काँग्रेसची आघाडी 

लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस तीन जागांवर आघाडीवर आहे. सध्या पोस्टल बॅलेट पेपरची मतमोजणी सुरू आहे.

2 हजार उमेदवारांचा फैसला

मराठवाड्यात सरासरी ७० टक्के मतदान झाले असून, २ हजार ८१९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात शनिवारी बंद झाले होते.

मराठवाड्यात कोणाची प्रतिष्ठा पणाला?

१. जिल्हा परिषदेतील जागा आणि उमेदवार

  • छत्रपती संभाजीनगर: ६२ जागा (२१७ उमेदवार)

  • धाराशीव: ५४ जागा (१८६ उमेदवार)

  • लातूर: ५८ जागा (१९४ उमेदवार)

  • परभणी: ५४ जागा (१७९ उमेदवार)

२. पंचायत समितीमधील जागा आणि उमेदवार

  • छत्रपती संभाजीनगर: १२४ जागा (३९८ उमेदवार)

  • धाराशीव: १०८ जागा (३५५ उमेदवार)

  • लातूर: ११६ जागा (३७२ उमेदवार)

  • परभणी: १०८ जागा (३४२ उमेदवार)

३. कोणाची प्रतिष्ठा पणाला?

मराठवाड्यातील या चारही जिल्ह्यांत महायुतील भाजप, शिवसेना-शिंदे, राष्ट्रवादी-अजित पवार विरुद्ध महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना-ठाकरे, राष्ट्रवादी-शरद पवार अशी थेट लढत आहे.

संभाजीनगर: संदीपान भुमरे (शिवसेना) आणि अंबादास दानवे (ठाकरे गट) यांच्यातील वर्चस्वाची लढाई.

लातूर: विलासराव देशमुख वारसा (काँग्रेस) विरुद्ध भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर.

धाराशीव: ओमराजे निंबाळकर (ठाकरे गट) विरुद्ध तानाजी सावंत (शिवसेना) यांची प्रतिष्ठा.

परभणी: संजय जाधव (ठाकरे गट) विरुद्ध महायुतीचे स्थानिक नेते.

४. गेल्या निवडणुकीचे (२०१७) सरासरी संख्याबळ

  • लातूर: भाजपचे वर्चस्व होते (३६ जागा)

  • परभणी: राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा प्रभाव होता.

  • धाराशीव: शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चुरस होती.

  • संभाजीनगर: शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता (१८ जागा).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news