

नसरापूर: बनेश्वर रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याचा आक्षेप घेत नसरापूर ग््राामस्थांनी घटनास्थळी आलेल्या ‘पीएमआरडीए’च्या कार्यकारी अभियंत्यांना संबंधित ठेकेदाराच्या कामाबाबत तक्रार केली असता उपस्थित अधिकाऱ्यांनीच तत्कालीन अधिकाऱ्यांचे अंदाजपत्रक बरोबर नसल्याने काम चुकीचे होत असल्याचे कबुली देत काढता पाय घेतला. ‘पीएमआरडी’च्या या भोंगळ कारभारामुळे ग््राामपंचायत सदस्यांसह ग््राामस्थांना कपाळावर हाणून घेण्याची वेळ आली.
नसरापूर ( ता. भोर ) येथील बनेश्वर कमान ते मंदिरापर्यंत सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी ‘पीएमआरडीए’चे कार्यकारी अभियंता वसंत नाईक व उपअभियंता शिकलगार यांनी भेट दिली. या वेळी उपसरपंच इरफान मुलाणी, माजी उपसरपंच गणेश दळवी, सुधीर वाल्हेकर, युवराज वाल्हेकर, ज्ञानेश्वर झोरे, बनेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव अनिल गयावळ, विश्वस्त प्रकाश जंगम, सुभाष चव्हाण आदी ग््राामस्थांनी रस्त्याच्या कामाबाबत आक्षेप घेतला.
नसरापूर ते बनेश्वर रस्त्यासाठी ‘पीएमआरडीए’ ने 2 कोटी 94 लाख 36 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या रस्त्याच्या नदीकडील बाजूला असलेली जुनी संरक्षक भिंत पाडून नव्याने साडेसातशे मीटर लांबीच्या रस्त्यावर साडेपाच मीटर रुंदीचे सिमेंट काँक्रिटीकरण होणार व डाव्या बाजूचे पाणी नदी बाजूकडे वाहून जाण्यासाठी तीन ठिकाणी तीन फूट व्यासाच्या वाहिनीचे छोटे पूल व दोन फूट व्यासाच्या दहा वाहिन्या जागोजागी पाणी वाहून जाण्यासाठी आडवे टाकले जाणार, अशी माहिती तत्कालीन अभियंत्यांनी ग््राामपंचायत तसेच ग््राामस्थांना दिली होती.
प्रत्यक्षात काम सुरू झाल्यावर जुन्या संरक्षक भिंतीचा वरील काही भाग पाडून त्याच भिंतीची डागडुजी केली जाणार असल्याचे तसेच रस्त्यात दोनच ठिकाणी मोऱ्या व आडव्या वाहिन्यांची संख्या कमी केली असल्याचे समजतच ग््राामस्थांनी मंजूर अंदाजपत्रकानुसार काम करण्याची मागणी केली आहे. गुरुवारी होणाऱ्या सल्लागार बैठकीला मुख्य ठेकेदाराला समक्ष हजर राहण्याची मागणी इरफान मुलाणी, ज्ञानेश्वर झोरे यांनी केली.
जुनी संरक्षक भिंत मजबुत असल्याने त्यावरील विटांच्या कामाचा बोजा कमी करून तेथे लोखंडी ग््राील बसवण्यात येणार आहे. मात्र, ग््राामस्थांची मागणी कायम राहिल्यावर याबाबत गुरुवारी (दि. 8) तज्ज्ञ सल्लागारांसह ग््राामस्थांची संयुक्त बैठक घेऊ.
वसंत नाईक, अभियंता, पीएमआरडी, पुणे