Haveli 7 Registration Office Irregularities: हवेली-७ दुय्यम निबंधक कार्यालयातील ३४ दस्तांत अनियमितता

दस्तनोंदणी तपासणीत नियमभंग उघड; सह दुय्यम निबंधकांवर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस
Office
OfficePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: दस्तनोंदणीच्या शहरातील वडगाव शेरी चंदनगरस्थित हवेली क्र. ७ या दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणीच्या तपासणीत ३४ दस्तांमध्ये विविध प्रकारची अनियमितता आढळून आली आहे. या अनियमिततेची नोंदणी विभागाने गंभीर दखल घेत सह दुय्यम निबंधकांवर प्रशासकीय शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची शिफारस केली आहे. या निबंधक कार्यालयाकडून सह जिल्हा निबंधक कार्यालयाकडे याबाबतचा अहवाल पाठविला आहे.

Office
Navratri Fasting Food Prices: नवरात्र उपवासाचे साहित्य महागले; भगरीच्या दरात वाढ, शेंगदाणा स्वस्त

नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या तपासणी पथकाने केलेल्या पाहणीत १२ दस्तांमध्ये मुंबई धारणनुसार जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि त्याचे एकत्रीकरण अधिनियम, १९४७ मधील तरतुदींचे पालन न करणे तसेच मुद्रांक शुल्क कमी भरणे, यासह नोंदणी शुल्कातही तफावत आढळल्याची बाब नोंदणी विभागाच्या अहवालात नमूद केली आहे.

Office
MHADA Pune Housing Lottery: म्हाडाच्या घरांच्या लॉटरीला सर्व्हरचा अडथळा; १८ हजार कागदपत्रे पडताळणीविना

यासह काही दस्तांमध्ये रेरा प्रमाणपत्र नसणे, गुंठेवारी नियमितीकरण दाखल्याची आवश्यक पडताळणी न करणे. विकास कराराच्या एका दस्तासाठी अपेक्षित मुद्रांक शुल्क भरलेले नसणे, वाटणीपत्राच्या दस्तातही मुद्रांक शुल्क अपेक्षित भरल्याचे आढळून आले आहे.

Office
Pune Consumer Commission Builder Refund: घराचा ताबा न दिल्याने बांधकाम व्यावसायिकाला दणका; ग्राहकाला ९ लाखांची परतफेड

गेल्या काही महिन्यांपासून अधिकारी मनमानी पद्धतीने दस्तनोंदणी करीत होते. ही बाब वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी चौकशी समिती नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या. या समितीच्या अहवालात नियमभंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

रोहन सुरवसे पाटील, सामाजिक कार्यकर्ते

Office
NMC Doctor Advertising Guidelines: डॉक्टरांच्या जाहिरातींवर एनएमसीचा चाप; हमखास उपचारांच्या दाव्यांना बंदी

१७ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हवेली-७ कार्यालयातील दस्तांची तपासणी करण्यात आली. तपासणी पथकाने सादर केलेल्या अहवालात एकूण २१ दस्तांबाबत आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. याबाबत संपूर्ण पडताळणी करून कार्यवाही करण्यात येईल.

मंगेश खामकर, सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news