Purandar Crime: पुरंदरमधील वृद्ध दाम्पत्याच्या दुहेरी हत्येतील संशयित २४ तासांत जेरबंद

येरवड्यापासून नसरापूरपर्यंत पोलिसांचा थरारक पाठलाग; चेलाडी उड्डाणपुलावर कारमधून पळणाऱ्या आरोपीला पकडले
Purandar Double Murder Accused Arrested
Purandar Double Murder Accused ArrestedPudhari
Published on: 
Updated on: 

नसरापूर: जुन्या वादाच्या कारणावरून पुरंदर तालुक्यातील पानवडी येथे वृद्ध दाम्पत्याची हत्येतील संशयित आरोपीला राजगड व सासवड पोलिसांच्या संयुक्त पथकाने पुणे- सातारा महामार्गावरील चेलाडी उड्डाणपुलावर चारचाकी कारमधून पळून जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास जेरबंद केले आहे. घटनेनंतर अवघ्या २४ तासातच आरोपीचा पोलिसांनी येरवड्यापासून ते नसरापूरपर्यंत थरारक पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवळल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. या हत्याकांडाच्या तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

Purandar Double Murder Accused Arrested
Pune Cantonment Waste Management: पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर; रोज ३० ते ४० टन कचरा उघड्यावर टाकण्याची वेळ

रत्नमाला मोहन धिवार (वय ७२) आणि मोहन बाबुराव धिवार (वय ८३, दोघेही रा. पानवडी, ता. पुरंदर) या वृद्ध दाम्पत्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या झाल्याची घटना पानवडी येथे रविवारी (दि. २५) घडली होती. या घटनेमुळे पानवडी गावासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी गणेश सुभाष धिवार (वय २७, पानवडी, ता. पुरंदर) असे गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून नसरापूर (ता. भोर l) येथील पुणे-सातारा महामार्गावरील चेलाडी उड्डाणपुलावर जेरबंद केले.

Purandar Double Murder Accused Arrested
Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर १ नोव्हेंबरपासून मालवाहू वाहनांना बंदी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायी, बैल घेऊन जाण्यावरून झालेल्या जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयिताचा शोध घेण्यासाठी राजगड आणि सासवड पोलिसांनी संयुक्त पथकाच्या माध्यमातून शोधमोहीम राबवली. या कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे, चेतन मछले, तुकाराम राठोड, पोलीस हवालदार औदुंबर अडवाल, राहुल पठाडे, समीर भालेराव, पप्पू शिंदे, काळे, सोनवणे, लोंढे, शेंडे, मखरे तसेच पोलीस शिपाई अनिकेत सोनवणे, चारुदत्त देशमुख, राऊत, हिप्परकर, चव्हाण आणि कुमावत यांनी सहभाग घेतला होता.

Purandar Double Murder Accused Arrested
Pune Dengue Control: पुण्यात डेंग्यू नियंत्रणासाठी महापालिका ॲक्शन मोडवर; खासगी रुग्णालयांनाही निर्देश

२५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.२० च्या दरम्यान मयत वृद्ध दाम्पत्य आपल्या घराकडे निघालेले असताना घराच्या अंगणात आधीच तयारीत असलेल्या आरोपीने वृद्धांवर धारदार शस्त्राने जोरदार हल्ला चढविला. यामध्ये दोघानाही जबर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि त्यातच रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

Purandar Double Murder Accused Arrested
Pune National Deworming Campaign: पुणे जिल्ह्यात आज राष्ट्रीय जंतनाशक मोहीम; १ ते १९ वर्षांच्या मुलांना मोफत गोळ्या

मयत धिवार पती- पत्नी आणि आरोपी गणेश धिवार हे एकाच भावकीतील असून आरोपीचे कुटुंब गेल्या दोन ते तीन पिढ्यापासून रोजगारानिमित्त बाहेरगावी राहायला आहेत. त्यामध्ये आरोपी गणेश धिवार हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. काही दिवसापूर्वीच तुरुंगातून सुटून आला होता. त्याला पुन्हा तडीपार केल्याने मूळ गावी राहायला आला होता. मात्र त्याच्या प्रवृत्तीने निष्पाप वृद्ध दाम्पत्याचा जीव घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news