Pune Dengue Control: पुण्यात डेंग्यू नियंत्रणासाठी महापालिका ॲक्शन मोडवर; खासगी रुग्णालयांनाही निर्देश

डेंग्यू रुग्णांची माहिती IH​​IP पोर्टलवर तातडीने नोंदवा; घरी गेलेल्या रुग्णांच्या प्लेटलेट्सवरही लक्ष ठेवण्याचे आवाहन
Naval Kishore Ram
Naval Kishore RamPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: डेंग्यूच्या रुग्णावर उपचार झाल्यानंतरही पुन्हा रक्ताच्या प्लेटलेट्स कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे घरी गेलेल्या रुग्णांवरही लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे डेंग्यूच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिकेने खासगी रुग्णालयांनाही उपाययोजनांच्या अंमलबजावणीत सहभागी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, डेंग्यूच्या रुग्णांना तातडीने दाखल करून आवश्यक उपचार आणि रुग्णांची माहिती 'इंटिग्रेटेड हेल्थ इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म' (आयएचआयपी) पोर्टलवर त्वरित नोंदवावी, असे निर्देश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सोमवारी दिले.

Naval Kishore Ram
Pune National Deworming Campaign: पुणे जिल्ह्यात आज राष्ट्रीय जंतनाशक मोहीम; १ ते १९ वर्षांच्या मुलांना मोफत गोळ्या

पुणे शहरातील डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या दालनात खासगी वैद्यकीय रुग्णालयांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली. आरोग्य अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी, परिमंडळ व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी आणि खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. डेंग्यूबरोबरच इतर आजारांच्या निदानानंतर संबंधित रुग्णांची माहिती आयएचआयपी पोर्टलवर तातडीने नोंदविण्याच्या सूचनाही खासगी रुग्णालयांना देण्यात आल्या.

Naval Kishore Ram
Pune Waste Management: पुणे महापालिकेचा स्वच्छतेचा मेगा प्लॅन; घंटागाड्या ९५२, सफाई कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट

रुग्णांची माहिती वेळेत उपलब्ध झाल्यास आजाराच्या परिस्थितीवर लक्ष ठेवणे आणि आवश्यक उपाययोजना करणे शक्य होणार आहे. डेंग्यूबाबत जनजागृती करताना केवळ बाह्यरुग्ण विभागावर अवलंबून न राहता आंतररुग्ण विभागातूनही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना माहिती देण्यावर आयुक्तांनी भर दिला. ताप आल्यास उपचार घेणे, रुग्णालयातून घरी गेल्यानंतरही प्रकृतीकडे लक्ष देणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेणे आवश्यक आहे. डेंग्यूच्या काही रुग्णांमध्ये आजाराच्या पुढील टप्प्यात रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याची शक्यता असल्याने वैद्यकीय सल्ला आणि देखरेख महत्त्वाची असल्याचे नवल किशोर राम यांनी नमूद केले.

Naval Kishore Ram
Pune Graduate Teacher Constituency Election: पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांत विजयाचा कोटा किती? १.२१ लाख आणि २६ हजार मतांच्या आकड्यांवर लक्ष

जनजागृतीत नागरिकांनी सहभाग घ्यावा

डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी महानगरपालिका आणि आरोग्य विभागाकडून धूरफवारणी, औषधफवारणी आणि विविध माध्यमांतून जनजागृती केली जात आहे. त्याचबरोबर नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा असून, नागरिकांनी हा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी घरात व परिसरात पाणी साचू देऊ नये, पाण्याची भांडी आणि साठवण पात्रे नियमित स्वच्छ ठेवावीत, डासोत्पत्ती होऊ शकणाऱ्या जागा नष्ट कराव्यात, असे आवाहनही राम यांनी केले.

Naval Kishore Ram
Mission Murghas Scheme: राज्यातील ३०५ तालुक्यांत दुष्काळ; चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘मिशन मुरघास’

डेंग्यू किंवा अन्य आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना पुणे महानगर पालिकेच्या शहरी गरीब योजनेची माहिती देऊन पात्र नागरिकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत. खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या अडचणींची दखल घेऊन त्यावर तातडीने योग्य उपाययोजना करावी.

नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महानगरपालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news