Pune National Deworming Campaign: पुणे जिल्ह्यात आज राष्ट्रीय जंतनाशक मोहीम; १ ते १९ वर्षांच्या मुलांना मोफत गोळ्या

रक्तक्षय आणि कुपोषण रोखण्यासाठी आरोग्य विभागाचा पुढाकार; मोहिमेतून वंचित मुलांसाठी ३ नोव्हेंबरला पुन्हा संधी
National Deworming Campaign
National Deworming CampaignPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: मुलांमधील जंतसंसर्गामुळे होणारा रक्तक्षय आणि कुपोषण रोखण्यासाठी पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज (मंगळवार) राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे. एक ते १९ वर्षे वयोगटातील शाळा, अंगणवाड्या, कनिष्ठ महाविद्यालये आणि वरिष्ठ महाविद्यालयांच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना, मुला-मुलींना मोफत जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत.

National Deworming Campaign
Pune Waste Management: पुणे महापालिकेचा स्वच्छतेचा मेगा प्लॅन; घंटागाड्या ९५२, सफाई कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार सरकारी, अनुदानित आणि खासगी शाळांसह महापालिका शाळा, आश्रमशाळा, सीबीएसई शाळा, गुरुकुल आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचाही मोहिमेत समावेश करण्यात आला आहे.

National Deworming Campaign
Pune Graduate Teacher Constituency Election: पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांत विजयाचा कोटा किती? १.२१ लाख आणि २६ हजार मतांच्या आकड्यांवर लक्ष

विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार जंतनाशक गोळ्यांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभागाने पात्र लाभार्थ्यांची माहिती घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या आणि संबंधित शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्याचे नियोजन आहे.

National Deworming Campaign
Mission Murghas Scheme: राज्यातील ३०५ तालुक्यांत दुष्काळ; चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘मिशन मुरघास’

शाळेत जाणाऱ्या मुलांना शाळेत, तर अंगणवाडीत नोंद असलेल्या बालकांना अंगणवाडीत गोळ्या दिल्या जाणार आहेत. शाळा किंवा अंगणवाडीत न जाणाऱ्या पात्र मुलांच्या समावेशासाठी स्थानिक आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधता येईल. मात्र, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील केंद्रनिहाय वेळापत्रक तसेच लाभार्थ्यांची स्वतंत्र संख्या अद्याप उपलब्ध झालेली नाही. महापालिका, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालये आणि जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्यांमध्ये या गोळ्या मिळणार आहेत.

National Deworming Campaign
Rabies Vaccine Shortage: राज्यातील १२६ सरकारी रुग्णालयांत रेबीज लसच नाही; ३७५ रुग्णालयांत इम्युनोग्लोबुलिनचा तुटवडा

जंतनाशक मोहिमेंतर्गत वंचित राहिलेल्या मुला-मुलींसाठी ३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. आजारी असलेल्या मुलांना किंवा विशेष वैद्यकीय काळजी आवश्यक असलेल्या विद्यार्थ्यांना गोळी देण्यापूर्वी आरोग्य कर्मचाऱ्यांचा सल्ला घ्यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news