Purandar Land Acquisition Compensation: पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी सोमवारी महत्त्वाची बैठक; शेतकऱ्यांशी दरनिश्चितीवर चर्चा

उद्योग विभागाने प्रस्तावाला दिली मान्यता; भूसंपादनासाठी तब्बल ५ हजार कोटींचा अंदाज
Purandar Airpoart
Purandar AirpoartPudhari
Published on
Updated on

पुणे: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी मोबदला निश्चित करण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सोमवारी (ता. 8) तेथील शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी जमिनीच्या दरनिश्चितीबाबत वाटाघाटी करण्यात येतील. त्यानंतर भूसंपादनाच्या मोबदल्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल. राज्य सरकारच्या निर्णयानंतर प्रत्यक्ष भूसंपादन आणि शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

Purandar Airpoart
Pune Contract Workers Exploitation: कंत्राटी कामगारांना नियुक्तिपत्र देणे अनिवार्य; पिळवणुकीला मोठा प्रतिबंध

डुडी यांनी गेल्या आठवड्यात उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन यांची भेट घेऊन या प्रस्तावाबाबत चर्चा केली होती. उद्योग विभागाने जिल्हा प्रशासनाचा भूसंपादनाचा प्रस्ताव मान्य केल्याचे कळवले आहे.

Purandar Airpoart
Shirwali Liquor Seizure: शिरवलीत ७ लाखांचा विदेशी दारूसाठा जप्त; दोघांना अटक

याबाबत बोलतांना डुडी म्हणाले, पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण केली आहे. भूसंपादनापोटी द्यावयाच्या मोबदल्याच्या रकमेचा तपशील असलेला अहवाल 11 नोव्हेंबरला राज्य सरकारकडे पाठवला होता. राज्य सरकारने तो अहवाल मान्य करून उद्योग विभागाकडे पाठविला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कायद्यातील तरतुदीनुसार उद्योग विभागाची या अहवालाला मान्यता मिळणे आवश्यक असते. उद्योग विभागाकडून या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

Purandar Airpoart
Pandare Village Development: पणदरे… गाव तसं चांगलं; पण राजकीय कुरघोडीत विकास ठप्प

भूसंपादनासाठी कायद्यानुसार येणारा दर, शेतकऱ्यांची अपेक्षा, जिल्हा प्रशासनाची शिफारस ही राज्य सरकारला कळविण्यात येईल. त्यासाठी सोमवारी शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे. शेतकऱ्यांसोबत एक-दोन बैठका होतील.

Purandar Airpoart
Nira Dam Water Storage: निरा खोऱ्यात धरणसाखळीत तब्बल 97.71 टक्के साठा

मोबदल्याबाबत राज्य सरकार अंतिम निर्णय घेईल. त्यांचा निर्णय झाल्यानंतर, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. सुमारे पाच हजार कोटी रुपये भूसंपादनासाठी लागतील, असा प्राथमिक अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news