Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळ भूसंपादनात 96% जमीन ताब्यात; 40 हेक्टरसाठी न्यायालयीन लढाई

मोबदल्यावरून वाद तीव्र; उर्वरित जमीन सक्तीने संपादित होण्याची शक्यता, शेतकऱ्यांना अतिरिक्त लाभ गमावण्याची भीती
Purandar Airport Project
Purandar Airport ProjectPudhari
Published on
Updated on

पुणे: पुरंदर तालुक्यात प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत केवळ ४० हेक्टर जमीन अद्याप प्रशासनाच्या ताब्यात आलेली नसून, वाढीव मोबदल्याच्या मागणीसाठी संबंधित शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Purandar Airport Project
Prashast App 2.0: प्रशस्त ॲप 2.0 ची अंमलबजावणी; सप्टेंबर 2026 पर्यंत 100% विद्यार्थी स्क्रिनिंगचे आदेश

मात्र, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीपैकी ९६ टक्के जमीन संपादित झाल्याने उर्वरित जमिनीचेही सक्तीने संपादन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त लाभ गमवावा लागू शकतो, अशी भीती प्रशासनातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Purandar Airport Project
FYJC Admission 2026: अकरावी प्रवेश पहिली विशेष फेरी जाहीर; पुण्यात 28,234 विद्यार्थ्यांना महाविद्यालय वाटप

विमानतळासाठी पुरंदर तालुक्या तील सात गावांतील १२१६ हेक्टर जमीन संपादित करण्यात येत आहे. राज्य सरकारने प्रतिएकर १ कोटी ६१ लाख रुपयांचा मोबदला निश्चित केला असून, आतापर्यंत १ हजार १० हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. यासाठी १ हजार १५० कोटी रुपयांचे वाटप केले असून, पुढील टप्प्यासाठी एमआयडीसी कडून आणखी एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. उर्वरित जमीनही महिनाभरात ताब्यात घेण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

Purandar Airport Project
Unauthorized Plot Purchase: पुण्यात 23 गावांतील नागरिकांना महापालिकेचा इशारा; प्लॉट खरेदीपूर्वी कागदपत्र तपासा

पारगाव परिसरातील ४० हेक्टर जमिनीबाबत काही शेतकऱ्यांनी वाढीव मोबदल्याच्या अपेक्षेने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र, प्रकल्पाच्या बहुतांश जमिनीचा ताबा प्रशासनाकडे गेल्यामुळे या जमिनीचे सक्तीने संपादन होण्याची शक्यता अधिक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत स्वेच्छेने संपादनास संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारे काही अतिरिक्त लाभ न्यायालयीन वादात अडकलेल्या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

Purandar Airport Project
Maharashtra TET Exam Online: टीईटी परीक्षा आता ऑनलाइनच; आयबीपीएसला लवकर परीक्षा घेण्याचे निर्देश

...या भागातील जमिनीच्या वाढताहेत किमती

मोबदला स्वीकारलेल्या अनेक शेतकऱ्यांनी दौंड, बारामती, शिरवळ आणि फलटण परिसरात नव्याने शेती खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्या भागातील जमिनीच्या किमती वाढत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, काही ठिकाणी कौटुंबिक वादांमुळे मोबदल्याचे वाटप रखडल्याने संबंधित शेतकऱ्यांनाही वाढलेल्या दराने जमीन खरेदी करावी लागू शकते. त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेत होणारा विलंब हा शेतकऱ्यांच्या आर्थिक हितालाच बाधक ठरण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news