Purandar Airport Project: पुरंदर विमानतळाच्या कामाला गती; डीपीआरसाठी सल्लागार नियुक्तीची निविदा प्रक्रिया सुरू

छत्रपती संभाजीराजे ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तांत्रिक सर्वेक्षण आणि व्यवहार्यता अभ्यास होणार; सात गावांतील १,२१६ हेक्टर क्षेत्रावर प्रकल्प प्रस्तावित
Purandar Airport Project
Purandar Airport ProjectPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. विमानतळाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी आवश्यक तांत्रिक सर्वेक्षणे आणि अभियांत्रिकी अभ्यास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने (एमएडीसी) सल्लागार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात नोटीस प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे विमानतळाच्या पुढील नियोजनाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

Purandar Airport Project
Maharashtra Exam Fee Waiver: दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; भरलेले पैसे परत मिळणार

एमएडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी 'एक्स'द्वारे यासंदर्भातील माहिती दिली. पुरंदर तालुक्यातील पारगाव, कुंभारवळण, वनपुरी, एखतपूर, उदाचीवाडी, मुंजवडी आणि खानवडी या सात गावांतील सुमारे १,२१६ हेक्टर क्षेत्रावर हा विमानतळ प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून, दुसरीकडे डीपीआर तयार करण्याच्या कामालाही वेग दिला जात आहे.

Purandar Airport Project
Rana Suryavanshi Attack Case: राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणातील सुपारीची साखळी उघड; मुख्य सूत्रधाराचे गूढ कायम

एमएडीसीकडून यापूर्वीच संबंधित सात गावांतील जागेचा व्यवहार्यता अभ्यास करण्यात आला आहे. आता अंतिम डीपीआर तयार करण्यासाठी आवश्यक असलेली उर्वरित सर्वेक्षणे, तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता अभ्यास आणि निविदा प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्यासाठी सल्लागार नियुक्त केला जाणार आहे. या प्रक्रियेसाठी निविदा नोटीस प्रसिद्ध केली आहे. निविदेच्या सविस्तर कागदपत्रांमध्ये कामाची व्याप्ती, मुदत, अंदाजित खर्च आणि अंतिम तारीख यांचा तपशील दिला आहे.

Purandar Airport Project
Kashibai Navale Hospital Salary: काशीबाई नवले रुग्णालयातील डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे नऊ महिन्यांचे वेतन थकीत; दिवाळीपूर्वी आंदोलन

या सर्वेक्षणांचे निष्कर्ष आणि तांत्रिक-आर्थिक अभ्यासाच्या शिफारशींच्या आधारे विमानतळाच्या अंतिम प्रकल्प अहवालाला आकार मिळेल. त्यानंतरच्या नियोजनासाठीही हा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे सल्लागार नियुक्ती आणि सर्वेक्षणांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुरंदर विमानतळाच्या विकासाच्या पुढील टप्प्यांबाबत स्पष्टता येण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news