Ashadhi Wari Police Kits: आषाढी वारी बंदोबस्तातील पोलिसांसाठी पुनीत बालन ग्रुपकडून ९ हजार जीवनावश्यक किटचे वाटप

सोलापूर ग्रामीण आणि सातारा पोलिस दलाला मदत; हजारो पोलिस कर्मचाऱ्यांची वारीतील गैरसोय टळणार
Punit Balan Group Ashadhi Wari Police Kits
Punit Balan Group Ashadhi Wari Police KitsPudhari
Published on
Updated on

पुणे: पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या कालावधीत बंदोबस्तासाठी येणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी पुनीत बालन ग्रुप'कडून जीवनावश्यक वस्तूंचे ९ हजार किट देण्यात आले आहेत. या किटमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश असल्याने वारीच्या बंदोबस्ताच्या कालावधीतील पोलिस बांधवाची गैरसोय टळणार.

Punit Balan Group Ashadhi Wari Police Kits
Pune PMC DBT Fund For Students: पुणे महापालिकेच्या ५९ हजार विद्यार्थ्यांच्या खात्यावर २२.९८ कोटींचा डीबीटी निधी जमा

दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसमवेत लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दर्शनासाठी येत असतात. सातारा जिल्हा हद्दीतून पालखीचे मार्गक्रमण होत असताना २ हजार ७०० पुरुष पोलिस आणि ३०० महिला पोलिस बंदोबस्तासाठी असतात. त्यांच्यासाठी ३ हजार किट उपलब्ध करून देण्याची विनंती सातारा पोलिस अधीक्षक कार्यालयाने केली होती.

Punit Balan Group Ashadhi Wari Police Kits
Pune Municipal Corporation Seed Digital Project: ऑनलाइन सेवा असतानाही पुणे महापालिकेचा नवा ‘सीड’ प्रकल्प; ३५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

तसेच २५ जुलै रोजी पंढरपुरात भरणाऱ्या आषाढी वारीसाठी येणाऱ्या भक्तांच्या बंदोबस्तासाठी पंढरपुरात ६ हजार ५०० पुरुष पोलिस, तर २ हजार महिला पोलिसांचा बंदोबस्त लावलेला आहे. त्यांनाही जीवनाश्यक साहित्याचे किट उपलब्ध करून देण्याची विनंती पंढरपूर उपविभागीय कार्यालयाकडून युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडे केली होती.

Punit Balan Group Ashadhi Wari Police Kits
Pune ATS Shahzad Bhatti Investigation: पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील तरुणांची चौकशी; पुणे जिल्ह्यात ATS चे ६५ ठिकाणी छापे

त्यानुसार बालन यांनी तत्काळ हे किट उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार सोलापूर ग्रामीण पोलिस दलासाठी ७ हजार, तर सातारा ग्रामीण पोलिस दलासाठी २ हजार असे एकूण ९ हजार किट उपलब्ध करून दिले आहेत.

Punit Balan Group Ashadhi Wari Police Kits
Palsnath Temple: उजनीच्या पाण्यात पुन्हा लुप्त झाले ऐतिहासिक पळसनाथ मंदिर; यादवकालीन वास्तूला जलसमाधी

किटमधील वस्तू

कोलगेट पाऊच, टूथब्रश, पॅराशूट तेल बॉटल, ओडोमास, ग्लुकोज, डेटॉल साबण, शेंगदाणा चिक्की, कापडी मास्क, पाणी बॉटल आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटरी पॅड.

विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची अत्यंत काटेकोरपणे सुरक्षा व्यवस्था बघण्याचं महत्त्वाचं कार्य करत असतात. ही एकप्रकारे सेवाच असून, ही सेवा करत असताना त्यांचीही कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांच्या मागणीनुसार दैनंदिन वस्तूंचे किट देण्यात आले आहे.

पुनीत बालन, युवा उद्योजक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news