Palsnath Temple: उजनीच्या पाण्यात पुन्हा लुप्त झाले ऐतिहासिक पळसनाथ मंदिर; यादवकालीन वास्तूला जलसमाधी

मुसळधार पावसाने जलसाठ्यात वाढ; उन्हाळ्यात दर्शनासाठी खुले झालेले हेमाडपंथी मंदिर पुन्हा गेले पाण्याखाली
Palsnath Temple
Palsnath TemplePudhari
Published on
Updated on

पळसदेव: पुणे जिल्हा आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. परिणामी उजनी जलाशयातील ऐतिहासिक हेमाडपंथी पळसनाथ मंदिर पुन्हा एकदा पाण्याखाली गेले आहे.

Palsnath Temple
Pune MD Drug Case: कात्रज एमडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास दिल्ली-बंगळुरूपर्यंत; ५.७९ कोटींच्या अमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड

उन्हाळ्यात जलपातळी घटल्यानंतर हे मंदिर पूर्णपणे उघडे पडले होते. त्यावेळी पर्यटक, इतिहास अभ्यासक आणि छायाचित्रकारांनी मोठ्या संख्येने येथे भेटी दिल्या होत्या. उन्हाळ्यात दर्शनासाठी खुले झालेले हे यादवकालीन मंदिर उजनी धरणातील पाण्याची पातळी वाढताच आदृश्य झाले. त्यामुळे इतिहासप्रेमी आणि भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Palsnath Temple
Pune Vehicle Vandalism Case: पुण्यात मध्यरात्री १८ जणांच्या टोळक्याचा धुडगूस; पद्मावतीत चारचाकींची तोडफोड करून दहशत

हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर यादवकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानले जाते. काळ्या दगडांतील भक्कम बांधकाम, आकर्षक शिल्पकला आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना यामुळे या वास्तूला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

Palsnath Temple
Pune Music Shows: 'वैकुंठीचा राया' पुण्यात भक्तिरसाची स्वरमैफल; कार्यक्रम कधी- कुठे?

उजनी धरणामुळे शेती, सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठा लाभ झाला असला, तरी जलाशयाखाली गेलेल्या अशा ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाचा प्रश्नही अधोरेखित होत आहे. प्राचीन वास्तूंचे दस्तऐवजीकरण, संवर्धन आणि जनजागृतीसाठी अधिक प्रभावी प्रयत्नांची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. उजनीच्या पाण्यात दरवर्षी दिसणारे आणि पुन्हा अदृश्य होणारे पळसनाथ मंदिर हे इतिहास आणि विकास यांच्यातील वास्तवाची वेदनादायी साक्ष ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news