Pune ZP Committee Chairman Election: पुणे जिल्हा परिषदेत सभापतीपदासाठी नावे निश्चित; बारामतीचा पत्ता कट

मावळ, वेल्हे, हवेली, इंदापूरला संधी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Pune Jilha Parishad
Pune Jilha ParishadPudhari
Published on
Updated on

पुणे: जिल्हा परिषदेच्या विविध चार विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी अखेर मावळ, वेल्हे, हवेली आणि इंदापूर या तालुक्यांतील सदस्यांची नावे निश्चित करण्यात आली असून, ऐनवेळी बारामतीसह खेड, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांचा पत्ता कट झाला आहे.

Pune Jilha Parishad
Mahabhumi Portal Down: महाभूमी सेवा चार दिवस बंद; नागरिकांची गैरसोय वाढणार

मावळच्या दीपाली हुलावळे, वेल्हेच्या अमोल नलावडे, इंदापूरच्या अंकिता पाटील आणि हवेलीच्या जितेंद्र बढेकर यांना सभापतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

Pune Jilha Parishad
Maharashtra FRU Centers Closed: राज्यातील 64 एफआरयू केंद्रे बंद; मातृ-बाल आरोग्य धोक्यात

जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या बंगल्यावर गुरुवारी सकाळी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पाठवलेले बंद पाकिट उघडून ही नावे जाहीर करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, गटनेते श्रीमंत ढोले यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. जाहीर झालेल्या नावांवर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.

Pune Jilha Parishad
Uruli Kanchan Crime: उरुळी कांचनमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीचे अपहरण; परीक्षा देण्यास गेल्यानंतर बेपत्ता

दीपाली हुलावळे आणि अमोल नलावडे यांच्यात बांधकाम व आरोग्य आणि कृषी व पशुसंवर्धन या दोन महत्त्वाच्या समित्यांचे वाटप होणार असून, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी अंकिता पाटील आणि समाजकल्याण समिती सभापतीपदी जितेंद्र बढेकर यांची निवड निश्चित मानली जात आहे. चारही उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

Pune Jilha Parishad
Maharashtra Unseasonal Rain Crop Damage: अवकाळी पाऊस-गारपिटीने पुणे जिल्हा हादरला; पिकांचे प्रचंड नुकसान

दरम्यान, भोरचे विक्रम खुटवड यांनी सभापतीपद नाकारल्याने त्यांच्या जागी ऐनवेळी अमोल नलावडे यांना संधी देण्यात आली. तसेच, आमदारांनी काही तालुक्यांना संधी देऊ नये अशी केलेली मागणीही फेटाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडीमुळे जिल्हा परिषदेत मावळ, वेल्हे, हवेली आणि इंदापूर या तालुक्यांचा प्रभाव वाढला असून, बारामतीऐवजी इंदापूरने बाजी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news