Mahabhumi Portal Down: महाभूमी सेवा चार दिवस बंद; नागरिकांची गैरसोय वाढणार

सातबारा, 8-अ, प्रॉपर्टी कार्डसह सर्व ऑनलाइन महसूल सेवा तात्पुरत्या ठप्प
Online Application
Online ApplicationPudhari
Published on
Updated on

पुणे: संगणकीय प्रणालीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी भूमी अभिलेख आणि महसूल विभागाच्या सर्व ऑनलाइन सेवा गुरुवार दि. 2 एप्रिल ते रविवार दि. 5 एप्रिल 2026 या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत. या तांत्रिक कामामुळे नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीचे उतारे, प्रॉपर्टी कार्ड आणि इतर ऑनलाइन सुविधांचा लाभ घेता येणार नाही.

Online Application
Maharashtra FRU Centers Closed: राज्यातील 64 एफआरयू केंद्रे बंद; मातृ-बाल आरोग्य धोक्यात

प्रभारी अप्पर जमाबंदी आयुक्त विकास गजरे यांनी यासंदर्भात पत्र जारी केले आहे. दि. 2 दि. 5 एप्रिल या कालावधीत महाभूमी पोर्टल आणि भूमी अभिलेख विभागाच्या डिजिटल सात-बारा व 8-अ उतारा, मालमत्तापत्रक, जमीन मोजणीची ‌’क‌’ प्रत मिळविणे, फेरफार नोंदी, नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित काही महसूलसेवा या प्रमुख सेवा पूर्णपणे बंद राहणार असल्याचे भूमी अभिलेख विभागाने म्हटले आहे.

Online Application
Uruli Kanchan Crime: उरुळी कांचनमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीचे अपहरण; परीक्षा देण्यास गेल्यानंतर बेपत्ता

सेवा बंदचा अचानक निर्णय; नागरिकांची गैरसोय

सध्याच्या काळात नागरिक डिजिटल सातबारे उतारे घेत आहेत. सलग चार दिवस या ऑनलाइन सेवा बंद राहणार असल्याची माहिती नागरिकांना आधीच चार ते पाच दिवस देणे अपेक्षित असताना भूमी अभिलेख विभागाने याबाबतची जाहीर नोटीस आज प्रसिद्ध केली. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्या नागरिकांना जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, बँकेचे कर्ज किंवा इतर कामांसाठी तातडीने डिजिटल स्वाक्षरीचे उतारे हवे आहेत, त्यांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यांना आता चार दिवस वाट पाहावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news