Uruli Kanchan Crime: उरुळी कांचनमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीचे अपहरण; परीक्षा देण्यास गेल्यानंतर बेपत्ता

अपहरणाचा संशय; पोलिसांत गुन्हा दाखल
Kidnapping News
Kidnapping NewsPudhari
Published on
Updated on

उरुळी कांचन: दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर देण्यासाठी शाळेत गेलेल्या एका 16 वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची घटना उरुळी कांचन येथे घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kidnapping News
Maharashtra Unseasonal Rain Crop Damage: अवकाळी पाऊस-गारपिटीने पुणे जिल्हा हादरला; पिकांचे प्रचंड नुकसान

ही मुलगी उरुळी कांचन येथील एका विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होती. तिला बुधवारी (दि. 18) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पेपरसाठी उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालय परीक्षा केंद्रावर वडिलांनी दुचाकीवरून सोडले होते. मुलीला गेटवर सोडून ते घरी परतले. मात्र, दुपारी साडेबारा वाजता एका शिक्षकाने वडिलांना फोन करून ‌‘तुमची मुलगी परीक्षेला आली नाही‌’ असे कळविले.

Kidnapping News
Pune Water Supply Protest: मांजरीत पाणीटंचाईवर महिलांचे बेमुदत आंदोलन

मुलीच्या वडिलांनी तातडीने शाळेत धाव घेऊन शिक्षकांशी चर्चा केली. ‌‘सकाळी तिला गेटवर सोडले होते,‌’ असे त्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्ष वर्गात ती परीक्षेसाठी बसलीच नव्हती. नातेवाईक आणि शिक्षकांनी शाळेच्या परिसरासह उरुळी कांचनमध्ये सर्वत्र शोध घेतला; परंतु मुलगी मिळून आली नाही. ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही अज्ञाताने तिला अज्ञात कारणावरून पळवून नेले असावे, असा संशय वडिलांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news