Pune Election Staff Appointment: जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी 23,743 अधिकारी-कर्मचारी तैनात

7 फेब्रुवारीला मतदान; 3,605 मतदान केंद्रांवर यंत्रणा सज्ज
Employment
EmploymentPudhari
Published on
Updated on

पुणे: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने 23 हजार 743 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्यक्षात 18 हजार 179 अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज असून, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 30 टक्के अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. निवडणुकीच्या तारखेत बदल करण्यात आला असून, आता ही निवडणूक 7 फेबुवारीला होणार आहे.

Employment
Aviation Accidents India: मानवी त्रुटी व तांत्रिक बिघाड विमान अपघातांचे मुख्य कारण

जिल्ह्यात एकूण 3 हजार 605 मतदान केंद्र स्थापन केली आहेत. इंदापूर तालुक्यात सर्वाधिक 400 मतदान केंद्र असून, तेथे 2632 अधिकारी व कर्मचारी तैनात राहतील, तर वेल्हा तालुक्यात 105 मतदान केंद्र असून, तेथे 450 अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

Employment
E-Mojani Land Measurement: ई-मोजणी व्हर्जन 2 साठी पुण्यात नागरिकांसाठी मदत कक्ष

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या मतदारांच्या संख्येनुसार निश्चित करण्यात आली आहे. या सर्व मतदान केंद्रांसाठी 18 हजार 179 मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी 30 टक्के अतिरिक्त अधिकारी व कर्मचारी म्हणून 5 हजार 564 जणांची नेमणूक केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 23743 अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावरील कामासाठी नियुक्तीचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.

Employment
Maharashtra Leprosy Cases: कोरोनानंतर महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे पुन्हा आव्हान

बाराशेहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रांसाठी अतिरिक्त मतदान केंद्राध्यक्ष अर्थात प्रिसायडिंग ऑफिसरची नियुक्ती करण्यात येणार आहे. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तीन टप्प्यांत प्रशिक्षण घेण्यात येणार असून, पहिली दोन प्रशिक्षणे प्रत्येकी दोन दिवसांची असतील, तर तिसरे व अंतिम प्रशिक्षण प्रत्यक्ष मतदानाच्या आदल्या दिवशी जाईल.

Employment
Ajit Pawar Demise Election Impact: अजित पवार यांच्या निधनामुळे जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक प्रचार स्थगित

13 पैकी 8 तालुक्यांत सूक्ष्म निरीक्षक नियुक्त

प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक 1, 2 व 3 तसेच एक शिपाई यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच 13 तालुक्यांपैकी 8 तालुक्यांमध्ये सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र बारामती, मावळ, शिरूर, हवेली व पुरंदर या तालुक्यांमध्ये सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news