Pune Zilla Parishad Election: पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व; 74 पैकी 51 जागांवर घवघवीत विजय

जिल्हा परिषद व 13 पैकी 8 पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता; भाजपला मोठा धक्का
Pune Zilla Parishad Election
Pune Zilla Parishad ElectionPudhari
Published on
Updated on

पुणे : जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने विक्रमी 51 जागा जिंकत पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एकूण 73 गटांपैकी राष्ट्रवादीने 51 गट जिंकले, तर 13 पंचायत समित्यांपैकी राष्ट्रवादीने 8 पंचायत समित्या जिंकून जिल्हाही आपल्याच ताब्यात ठेवला आहे. अजितदादा पवार यांच्या निधनानंतरची सहानुभूतीची लाट प्रत्यक्ष मतदानात दिसून आली. बारामती, इंदापूर, आंबेगाव, मुळशी, वेल्हा, पुरंदर, शिरूर, मावळ या पंचायत समित्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. दौंड, इंदापूर, मुळशी, भोर, वेल्हा, इंदापूर, मावळ या भागांत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे तसेच भाजपला बसलेल्या फटक्यामुळे पुणे जिल्हा परिषदेवर सलग चौथ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळवली.

Pune Zilla Parishad Election
Mulshi Election Result: मुळशी तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व

बारामती : बारामती तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा गटांतील सर्व जागा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने पटकावल्या. भाजपने येथे चार जागी उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पंचायत समितीच्या 12 पैकी 2 जागा राष्ट्रवादीने भाजपला सोडल्या होत्या. त्यामुळे पंचायत समितीत राष्ट्रवादीला 12 पैकी 10 आणि भाजपला दोन जागा मिळाल्या.

Pune Zilla Parishad Election
Puranadar Zp Election Results 2026: पुरंदरमध्ये राष्ट्रवादी-भाजपने गड राखले, पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

मावळ : मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 5 गट व पंचायत समितीच्या 10 गणांतील सर्व 15 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवत राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली. 15-0 अशी एकतर्फी बाजी मारत तब्बल 25 वर्षे अबाधित राहिलेली भाजपची सत्ता उलथवून लावली.

आंबेगाव : तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच जागांपैकी तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला, तर शिंदे सेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली. तर, पंचायत समितीच्या 10 पैकी 8 गणांत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत.

मुळशी : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तीन जागांपैकी दोन जागांवर राष्टवादी काँग्रेसने विजय मिळविला. एका जागेवर भाजपचा उमेदवार विजयी झाला. पंचायत समितीत सहापैकी तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार), तर दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळाल्या. भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले.

Pune Zilla Parishad Election
Baramati Election Result : बारामतीत जिल्हा परिषदेच्या सहाही जागा राष्ट्रवादीकडे

पुरंदर : पुरंदरमध्ये जिल्हा परिषद गटात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने आपले गड कायम राखले. दोन्ही पक्षांना प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले. पंचायत समितीत राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या. भाजप व शिवसेनेने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या.

राजगड : राजगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन्ही गटांत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला. राजगड तालुका पंचायत समितीवरदेखील पक्षाचा झेंडा फडकविला. तब्बल चौदा वर्षांनंतर राष्ट्रवादीने पंचायत समितीवर सत्ता मिळवली आहे. याआधी पंचायत समितीवर माजी आमदार संग्राम थोपटे यांचे वर्चस्व होते.

शिरूर : तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. जिल्हा परिषदेच्या चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या. भाजपने तीन जागांवर विजय मिळविला. पंचायत समितीच्या चौदापैकी आठ जागा जिंकत राष्ट्रवादीने पंचायत समितीवर सत्ता स्थापन केली.

Pune Zilla Parishad Election
Rahul Kul: राहुल कुल यांना धक्का, राहू खामगाव गटात भाजपा उमेदवाराचा पराभव

दौंड : दौंड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सातपैकी सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून, एक जागा भाजपला मिळाली आहे, तर दौंड पंचायत समितीवर भाजपने 14 जागांपैकी 8 जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

हवेली : पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये एकूण बारा जागांपैकी सर्वाधिक 6 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला, तर भाजपला 4 जागा मिळाल्या. शिंदे सेनेला एक जागा, तर अपक्षाने एक जागा मिळवली. जिल्हा परिषदेमध्ये 6 पैकी राष्ट्रवादीला 4 जागा, तर भाजपला व शिंदे सेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली.

Pune Zilla Parishad Election
Rajgad Panchayat Samiti Result 2026 : राजगड तालुक्यात सत्तापरिवर्तन

खेड : खेड तालुक्यातील 5 जिल्हा परिषद गट व 9 पंचायत समिती गणांत शिवसेना उबाठा गट म्हणजेच आमदार बाबाजी काळे यांचे वर्चस्व सिद्ध झाले. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने 3 जिल्हा परिषद गटांत, तर 6 पंचायत समिती गणांत यश मिळविले.

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील आठ गटांपैकी पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे, तर तीन जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच, पंचायत समितीच्या एकूण सोळा जागांपैकी तब्बल आठ जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. तर, सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप व शिवसेना (उबाठा) पक्षाला प्रत्येकी एक-एक जागा मिळाली.

भोर : भोर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार जागांपैकी प्रत्येकी दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने जिंकल्या आहेत, तर पंचायत समितीच्या आठ जागांपैकी चार जागा भाजपने आणि चार राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news