

दौंड : दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज झालेल्या मतमोजणीत जिल्हा परिषदेच्या सात जागांपैकी सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बाजी मारली असून एक जागा भाजपला मिळाले आहे. तर दौंड पंचायत समितीवर भाजपाने 14 जागांपैकी आठ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे यात राष्ट्रवादी काँग्रेसला पंचायत समितीच्या सहा जगावर विजय मिळाला आहे
जिल्हा परिषदेच्या सात पैकी सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवल्याने माजी आमदार रमेश थोरात यांनी आपली तालुक्यावरील पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले आहे
तर दुसरीकडे मागील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक भाजपाला पंचायत समितीच्या केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते त्या ठिकाणी भाजपने आघाडी घेत पंचायत समितीच्या आठ जागांवर विजय मिळवत पंचायत समितीची सत्ता खेचून आणली आहे आजच्या मतमोजणी निकालानंतर भाजप आमदार राहुल कुल यांना राहू खामगाव गटात मतदारांनी मोठा धक्का दिला आहे. राहू खामगाव गटात भाजपाचे उमेदवार पराभूत झाल्याने कुल यांना हा धक्का समजला जात आहे
तर दुसरीकडे माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात यांनी केडगाव बोरी पारधी जिल्हा परिषद गटात विजय मिळवत जिल्हा परिषदेत प्रवेश केला आहे यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले वीरधवल जगदाळे यांनी देखील विजयाची हॅट्रिक करत खडकी देऊळगाव राजा गटातून जिल्हा परिषदेत बाजी मारली आहे.