Mulshi Election Result: मुळशी तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व

जिल्हा परिषदेच्या दोन जागांवर विजय, एक जागा भाजपाला, पंचायत समितीत राष्ट्रवादीला तीन जागा
Mulshi ZP Electio
Mulshi ZP ElectioPudhari
Published on
Updated on

पौड : मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तीन जागांपैकी दोन जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार)ने विजय मिळविला. एका जागेवर भाजपचा उमेदवार विजयी झाला. पंचायत समितीत सहापैकी तीन जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार)ला, तर दोन जागा राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळाल्या. भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले.

Mulshi ZP Electio
Shirur Rural ZP Election: क्रॉस वोटिंगने धाकधूक वाढवली!

मुळशी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पौड-अबंडवेट जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिलिंद नंदकुमार वाळंज हे ५२९७ मतांनी विजयी झाले. त्यांनी शिवसेना (उबाठा) उमेदवार अविनाश बलकवडे यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद वाळंज यांना १७,९५९, तर शिवसेनेचे अविनाश बलकवडे यांना १२,६६२ मते मिळाली.

Mulshi ZP Electio
Panvel ZP Election Clash | भाजप कार्यकर्त्याने पोलिस अधिकाऱ्याची पकडली गचंडी; पनवेल मतमोजणी केंद्रा बाहेर तणाव

पौड पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काजल अंकुश मोरे या विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोमल वाशिवले यांचा २१४५ मतांनी पराभव केला. काजल मोरे यांना ६१४७ मते मिळाली, तर कोमल वाशिवले यांना ४००२ मते मिळाली. अबंडवेट पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण धनवे यांनी शिवसेना (उबाठा) उमेदवार सचिन खैरे यांचा १७७६ मतांनी पराभव केला. प्रवीण धनवे यांना ८५४७ मते मिळाली, तर सचिन खैरे यांना ६७७१ मते मिळाली.

Mulshi ZP Electio
Kolhapur ZP Election | शिरोळ तालुक्यावर आ. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचे निर्विवाद वर्चस्व

माण-हिंजवडी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे शिवाजी बुचडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर साखरे यांचा १९६७ मतांनी पराभव केला. शिवाजी बुचडे यांना १७,९०५ मते मिळाली, तर सागर साखरे यांना १५,९३८ मते मिळाली.

Mulshi ZP Electio
Raigad ZP panchayat samiti results 2026 | म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचा गजर, राष्ट्रवादीने गड राखला

माण पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मंदा शेळके यांनी भाजपा पुरस्कृत उमेदवार रूपाली बोडके यांचा २३१० मतांनी पराभव केला. मंदा शेळके यांना ५९८१ मते मिळाली, तर रूपाली बोडके यांना ३६७१ मते मिळाली. हिंजवडी पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीच्या ऐश्वर्या वाघमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकीता वाघमारे यांचा १३२२ मतांनी पराभव केला. ऐश्वर्या वाघमारे यांना १०१२१ मते मिळाली, तर निकिता वाघमारे यांना ८७९९ मते मिळाली.

Mulshi ZP Electio
Maharashtra ZP Results 2026: जिल्हा परिषद निकालांचे पहिले कल हाती; राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

पिरंगुट-भूगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार शांताराम इंगवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महादेव कोंढरे यांचा १३८४ मतांनी पराभव केला. शांताराम इंगवले यांना ११,१४१ मते मिळाली, तर महादेव कोंढरे यांना ९,७५७ मते मिळाली.

Mulshi ZP Electio
Nanded ZP Hunger Strike | जलजीवन मिशनच्या कामात अनियमिततेचे आरोप; चौकशीसाठी जिल्हा परिषदेसमोर उपोषण

पिरंगुट पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल पवळे यांनी शिवसेना (उबाठा) उमेदवार रामदास गोळे यांचा ३६३ मतांनी पराभव केला. राहुल पवळे यांना ३७४१ मते मिळाली, तर रामदास गोळे यांना ३३७८ मते मिळाली. भूगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दगडूकाका करंजावणे यांनी शिवसेना (उबाठा) उमेदवार अनिल पवार यांचा ४३८ मतांनी पराभव केला. दगडूकाका करंजावणे यांना ६७३२ मते मिळाली, तर अनिल पवार यांना ६२९४ मते मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news