Pune Zp Election 2026: पुणे झेडपीची धुरा दौंड तालुक्याकडे? राष्ट्रवादीतर्फे वीरधवल जगदाळे, विवेक वळसे पाटील रिंगणात

pune zilla parishad president election 2026: राष्ट्रवादीकडून नावे निश्चित; बहुमतामुळे बिनविरोध निवडीची शक्यता, निवड प्रक्रिया आजच पूर्ण होणार
Pune Zp President Election 2026
Pune Zp President Election 2026Pudhari
Published on
Updated on

Pune Zp President Election 2026 virdhawal jagdale vivek valse patil

पुणे:
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दौंड तालुक्यातील वीरधवल जगदाळे, तर उपाध्यक्षपदासाठी आंबेगाव तालुक्यातील विवेक वळसे पाटील यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. काही वेळात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

Pune Zp President Election 2026
Otur Road Accident: ओतूरजवळ भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

राष्ट्रवादीकडे निर्विवाद बहुमत असल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे याच पक्षाचे होणार, हे निश्चित आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुढील अडीच वर्षांसाठी ‘सर्वसाधारण’ गटासाठी आरक्षित आहे. त्यामुळे पक्षातील निवडून आलेल्या अनुभवी आणि ज्येष्ठ सदस्यांना संधी मिळणार की एखाद्या नव्या चेहऱ्याच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. बुधवारी सकाळी शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी वीरधवल जगदाळे, तर उपाध्यक्षपदासाठी विवेक वळसे पाटील यांची नावे निश्चित करण्यात आली.

Pune Zp President Election 2026
Pune IVF Success: पुण्यात आयव्हीएफ उपचारांना यश; अपयशानंतर महिलेला मिळाले मातृत्व

तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुणे जिल्हा परिषदेला अखेर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मिळणार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. दुपारी ३ वाजता विशेष सभेला सुरुवात होईल. यामध्ये उपस्थित सदस्यांना उमेदवारांचे अर्ज दाखवून त्यांची छाननी केली जाईल. छाननीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी दिला जाईल. त्यानंतर अंतिम यादी जाहीर होईल. एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास ‘हात उंचावून’ मतदान घेतले जाईल. मात्र, केवळ एकच अर्ज आल्यास निवड बिनविरोध घोषित केली जाईल.

Pune Zp President Election 2026
Pune Municipal School Headmaster Vacancy: पुणे महापालिकेच्या 91 शाळांत मुख्याध्यापक पदे रिक्त

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दौंड तालुक्यातील खडकी-देऊळगाव गटातून विजयी झालेले वीरधवल जगदाळे यांचे नाव पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निश्चित झाल्यामुळे दौंड शहरात कार्यकर्त्यांनी जोरदार फटाके वाजवून जल्लोष केला. वीरधवल जगदाळे हे अजित पवार यांचे विश्वासू सहकारीअसून सलग तीन वेळा ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले त्यामुळे त्यांना प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव आहे.

Pune Zp President Election 2026
Pune Wolf Dog: पुण्यात ‘वुल्फ डॉग’चा वाढता वावर; टेकड्यांवर वनविभागाचे ‘ऑपरेशन’

तसेच पवार कुटुंबीयांशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. दौंडला अध्यक्षपदाचा मान हा दुसऱ्यांदा प्राप्त झाला आहे यापूर्वी वैशाली आबणे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या होत्या अनेक वर्षानंतर दौंड शहराला लाल दिवा मिळाला त्यामुळे कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news