Otur Road Accident: ओतूरजवळ भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

पिंपरी पेंढार येथे पिकअप-कार समोरासमोर धडक; चालक फरार, पोलिसांचा शोध सुरू
Otur Road Accident
Otur Road AccidentPudhari
Published on
Updated on

ओतूर: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर पिंपरी पेंढार गावच्या हद्दीत बुधवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास पिकअप व स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ओतूर येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पिकअप वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

Otur Road Accident
Pune IVF Success: पुण्यात आयव्हीएफ उपचारांना यश; अपयशानंतर महिलेला मिळाले मातृत्व

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ओतूरकडून आळेफाटाकडे जाणारी पिकअप (एमएच १४ एचजी ५६८६) आणि आळेफाटा येथून ओतूरकडे येणारी स्विफ्ट कार (एमएच १४ जीवाय २१३५) यांची पिंपरी पेंढार गावाच्या हद्दीत समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की स्विफ्ट कारचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात स्विफ्ट कार चालक अनिकेत (मयूर) नामदेव पानसरे (रा. ओतूर) यांचा जागीच मृत्यू झाला.

Otur Road Accident
Pune Municipal School Headmaster Vacancy: पुणे महापालिकेच्या 91 शाळांत मुख्याध्यापक पदे रिक्त

अपघातानंतर पिकअप चालक गाडीतून उडी मारून फरार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शामसुंदर जायभाये, राजेंद्र आमले, सुभाष केदारी तसेच होमगार्ड संदीप शिंदे, चैतन्य जाधव, प्रवीण भोर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून ओतूर परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news