Pune IVF Success: पुण्यात आयव्हीएफ उपचारांना यश; अपयशानंतर महिलेला मिळाले मातृत्व

तीन आयव्हीएफ, चार आययूआय अपयशानंतर फेमकेअरच्या उपचारांनी दिला आशेचा किरण; आई-बाळ दोघेही निरोगी
IVF
IVFPudhari
Published on
Updated on

पुणे: इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ)चे तीनदा झालेले अयशस्वी प्रयत्न, इंट्रायुटेरिन इन्सेमिनेशन (आययूआय)मध्येही चार वेळा आलेले अपयश अशा कठीण स्थितीत फेमकेअरने आशेचा किरण दाखविला. अनेक गुंते सोडवत प्रणीता कासार यांना मातृत्व बहाल करण्यात विज्ञानाला यश आले.

IVF
Pune Municipal School Headmaster Vacancy: पुणे महापालिकेच्या 91 शाळांत मुख्याध्यापक पदे रिक्त

बाणेर येथील फेमकेअर फर्टिलिटीमध्ये डॉ. पल्लवी टिपळे यांच्याकडे प्रणीता यांनी उपचार घेतले. आयव्हीएफ प्रक्रियेद्वारे 10 निरोगी भ्रूण तयार केले. तथापि, वारंवार होणाऱ्या इम्प्लांटेशनच्या अपयशामुळे गर्भाशयाच्या अंतःस्तराच्या ग््राहणक्षमतेबद्दल शंका निर्माण झाली. एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी ॲनालिसिस (ईआरए) किंवा चाचणीमध्ये गर्भाशय ‌’प्री-रिसेप्टिव्ह‌’ अवस्थेत असल्याचे आढळले. म्हणजेच गर्भरोपणासाठी योग्य कालावधी सामान्यापेक्षा निम्मा होता. निकालांनुसार, प्रोजेस्टेरॉनच्या चौथ्या दिवशी योग्य वेळी गर्भरोपण करणे आवश्यक होते.

IVF
Pune Wolf Dog: पुण्यात ‘वुल्फ डॉग’चा वाढता वावर; टेकड्यांवर वनविभागाचे ‘ऑपरेशन’

हिस्टेरोस्कोपीद्वारे केलेल्या पुढील तपासणीत गर्भाशयाच्या मागील भिंतीमध्ये सूक्ष्म बदल दिसून आले. जे काळजीपूर्वक काढून टाकण्यात आले. तसेच, गर्भाशयाच्या रक्तप्रवाहात अडथळा असल्याचे दिसून आले, त्यामुळे रक्तप्रवाह सुधारण्यासाठी लो मॉलिक्युलर वेट हेपरिन (एलएमडब्ल्यूएच) उपचार सुरू करण्यात आले. गर्भाशयातील रक्तप्रवाहाच्या कमतरतेमुळे, गर्भधारणेदरम्यान सतत काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे इंट्रा-युटेरिन ग््राोथ रिस्ट्रिक्शन (आययूजीआर) ची समस्या निर्माण होते. फेमकेअर टीमच्या सततच्या देखरेखीमुळे आणि वेळेवर केलेल्या उपचारामुळेच गर्भधारणा सुरक्षितपणे पूर्ण झाली. जवळपास 37 आठवड्यांनंतर, प्रणीताने गर्भाशयात वाढ खुंटलेल्या बाळाला जन्म दिला. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आई आणि बाळ दोघेही पूर्णपणे निरोगी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news