Pune Municipal School Headmaster Vacancy: पुणे महापालिकेच्या 91 शाळांत मुख्याध्यापक पदे रिक्त

मराठी 80 व उर्दू 11 शाळांमध्ये प्रमुख नाहीत; नव्या शैक्षणिक वर्षापूर्वी भरतीचा प्रयत्न
School Headmaster Vacancy
School Headmaster VacancyPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या शाळांमधील प्रशासकीय स्थितीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या मराठी माध्यमातील 80 आणि उर्दू माध्यमातील 11 अशा एकूण 91 शाळांमध्ये सध्या मुख्याध्यापकपदे रिक्त असल्याचे पालिकेच्या सर्वसाधारण सभेतील प्रश्नोत्तरातून उघड झाले आहे.

School Headmaster Vacancy
Pune Stray Dog Problem: पुण्यात भटक्या श्वानांचा वाढता धोका; दररोज 87 जणांना चावा

महापालिकेत गेल्या चार वर्षांपासून प्रशासक राजवट होती. त्यानंतर अलीकडेच महापालिका निवडणुका होऊन सभागृह पुन्हा अस्तित्वात आले आहे. सभागृह सुरू झाल्यानंतर सर्वसाधारण सभेतील प्रश्नोत्तरांचा क्रम पुन्हा सुरू झाला असून, त्यातून ही माहिती समोर आली. भाजपचे नगरसेवक योगेश मुळीक यांनी महापालिकेच्या शाळांमधील मुख्याध्यापक पदांच्या रिक्त जागांबाबत प्रशासनाकडे माहिती मागितली होती. त्यावर प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरात मराठी माध्यमातील 80 आणि उर्दू माध्यमातील 11 अशा एकूण 91 शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्याचे स्पष्ट केले आहे.

School Headmaster Vacancy
Pune TP Scheme Authority Decision: टीपी स्कीमवर अधिकार कोणाचा? निर्णय 3-4 महिन्यांत

दरम्यान, महापालिकेच्या माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाकडे एकूण 43 शाळा आहेत. त्यापैकी 18 शाळा अनुदानित असल्याची माहितीही प्रशासनाने दिली. मुख्याध्यापक पदे भरण्याबाबत पदोन्नती प्रक्रियेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा विचार करून पुढील कार्यवाही सुरू असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. येत्या नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही महापालिका प्रशासनाने आपल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news