Pune Jilha Parishad Election: पुणे जिल्हा परिषद निवडणूक: अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला

राष्ट्रवादी फुटीनंतरची पहिलीच लढत, पवार घराण्याचे वर्चस्व टिकणार की ढासळणार?
Ajit Pawar
Ajit PawarPudhari
Published on
Updated on

सुहास जगताप

पुणे: पुणे जिल्हा परिषदेवरील पवार घराण्याचे वर्चस्व कायम टिकवण्यासाठी येत्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा कस लागणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे आणि सर्वच निर्णय अजित पवारांच्या हाती असल्याने त्यांच्या व्यूहरचनेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar
PMC Election 2026 Result Live Update: पुण्यात मोठी उलथापालथ, आबा बागुल यांचा पराभव

पुणे जिल्हा परिषदेचा अलीकडचा इतिहास पाहता या जिल्हा परिषदेवर बारामतीच्या पवार घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. परंतु त्या वेळेला राष्ट्रवादी एकत्रित होती आणि शरद पवारांकडे पक्षाचे नेतृत्व होते, आता पक्षफुटीनंतर हे वर्चस्व ठेवण्याची जबाबदारी अजित पवारांकडे आलेली आहे. गेला इतिहास पाहता राष्ट्रवादी काँग््रेासला किंवा त्यापूर्वीही काँग््रेासला पुणे जिल्ह्यामध्ये विरोध होईल, असे तालुके गट, गण अतिशय अल्प प्रमाणात होते. त्यामुळे या निवडणुका कधी होऊन जात हेसुद्धा फारसे समजत नव्हते. त्यामुळे निर्विवादपणे काँग््रेास आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग््रेासचे वर्चस्व जिल्हा परिषदेवर राहिले आहे.

Ajit Pawar
Maharashtra SSC HSC Practical Exam Schedule: दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

सध्याच्या पूर्णपणे बदलेल्या राजकीय पटावर मात्र आता तशी स्थिती राहिलेली नाही, आता पुणे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील बलाढ्य नेते कोणत्या तरी पक्षाचा आसरा घेऊन अजित पवारांच्या विरोधात टक्कर देण्यासाठी उभे राहिलेले आहेत. बारामती आणि आंबेगाव हे दोन तालुके वगळता इतर तालुक्यांमध्ये अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला अतिशय कडवी लढत द्यावी लागणार आहे. इंदापूरमध्ये स्थानिक भीमा कृष्णा आघाडीतील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजप नेते प्रवीण माने, माजी आमदार यशवंत माने या मंडळींनी इंदापूर तालुक्यात या निवडणुकीत मोठीच चुरस निर्माण केलेली आहे, तर पुरंदरमध्ये शिवसेनेचे माजी मंत्री आमदार विजय शिवतारे आणि भाजपाचे माजी आमदार संजय जगताप हे दोन बलाढ्य नेते राष्ट्रवादीच्या जागा कमी करण्यासाठी मैदानात आहेत. दौंडमध्ये तर भाजपचे आमदार राहुल कुल हेच आहेत, त्यामुळे तिथेही वर्चस्व टिकविण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कडवी झुंज द्यावी लागेल. शिरूरमध्ये जरी

Ajit Pawar
Pune Municipal Voting Chaos: पुणे महापालिका मतदानात गोंधळ; मतदार याद्या व बोगस मतदानाचा फटका

विधानसभेला पराभव झाला असला तरी माजी आमदार अशोक पवार हे ठाण मांडून आहेत. त्यामुळे त्यांच्याशी झुंज देऊन राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त जागा शिरूरमध्ये विजयी करणे हेसुद्धा मोठे आव्हान अजित पवारांच्या समोर राहील, दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित निवडणुका लढविण्याचे ठरविले तर मात्र येथे चित्र बदलेल. परंतु भाजपची येथे मोठी ताकद असल्याने झुंज द्यावीच लागेल. मुळशीमध्ये शिंदे शिवसेना आणि आणि भाजप यांचे मोठ्या आव्हान अजित पवारांच्या पक्ष समोर असेल तर भोरमध्ये भाजपचे माजी आमदार आणि कसलेले अजित पवार विरोधक संग््रााम थोपटे हे आता दंड थोपटून उभे आहेत, त्यांनी नगरपालिकेमध्ये जरी नगराध्यक्ष त्यांचा झाला नसला तरी नगरपालिकेत बहुमत मिळवलेले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीत ही आपली ताकद दाखवण्यासाठी थोपटे जोरदार प्रयत्न करणार आहेत. भोर, मुळशी आणि वेल्हा या तालुक्यांमध्ये संग््रााम थोपटेंशी मोठी लढत राष्ट्रवादीला द्यावी लागेल. खेडमध्ये आमदार बाबाजी काळे, अतुल देशमुख ही मंडळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात उभी आहेत. तेथील माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना विरोध करणे या एका सूत्राखाली देशमुख-काळे आणि इतरही नेते एकत्र येऊन तिथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चांगली लढत देऊ शकतील. जुन्नर मध्येही अपक्ष, परंतु आता शिंदे शिवसेनेत असलेले आमदार शरद सोनवणे हे राष्ट्रवादीशी टक्कर घेण्यासाठी तयार झाले आहेत. जुन्नर नगरपालिकेवर वर्चस्व मिळवून त्यांनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे, आता माजी आमदार अतुल बेनके आणि शरद सोनवणे यांचा सामना जिल्हा परिषद पंचायत समितीत रंगेल.

Ajit Pawar
Kasba EVM Voting Complaint: कसबा प्रभाग 25 मध्ये ईव्हीएम गोंधळ; कमळालाच मत जात असल्याची तक्रार

आंबेगावमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग््रेासला थोडी उसंत मिळू शकते तिथे दिलीप वळसे पाटील यांच्या समोर फारसे आव्हान दिसत नाही. परंतु, निवडणुकीचा रंग भरून एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तेथील चित्र स्पष्ट होऊ शकते. एकंदरीत सर्व जिल्ह्याचा विचार केल्यास अजित पवार यांच्या पक्षासमोर मोठे आव्हान या जिल्हा परिषद निवडणुकीत उभे राहिले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय झाल्या उमेदवारीवाटप आणि बंडखोरी रोखण्याचीही डोकेदुखी वाढणार आहे.

दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचे चिन्ह

खेड, जुन्नर, आंबेगाव या तीन तालुक्यांमधील दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नेते आपण एकत्रित निवडणूक लढवावी या मताचे आहेत. परंतु त्यांच्या या मताला राज्य पातळीवरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून संमती मिळणार का हा यातला कळीचा मुद्दा आहे. तशी जर काहीतरी सापट काढून ही परवानगी दिली. तर मात्र खेड, जुन्नर, आंबेगावमध्ये अजित पवारांच्या समोर फार मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news