Pune Airport International Connectivity: पुणे विमानतळावरच होणार इमिग्रेशन-कस्टम्स प्रक्रिया; परदेश प्रवासासाठी हब अँड स्पोक मॉडेलची तयारी

दिल्ली-मुंबई विमानतळावरील वेळ वाचणार; पुणे विमानतळ परदेशी प्रवाशांसाठी फीडर हब म्हणून विकसित होणार
Pune Airport Hub And Spoke Model
Pune Airport Hub And Spoke ModelPudhari
Published on
Updated on

पुणे: केंद्र सरकारच्या हब अँड स्पोक मॉडेलअंतर्गत पुणे विमानतळ आता परदेशी प्रवाशांसाठी फीडर म्हणून कार्य करणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांची इमिग्रेशन आणि कस्टम्सची प्रक्रिया थेट पुणे विमानतळावरच पूर्ण होणार असून, दिल्लीतील विमानतळावर (हब) प्रवाशांना फक्त सिक्युरिटी चेकिंग करून परदेशात प्रवास करता येणार आहे.

Pune Airport Hub And Spoke Model
Pune Dengue Cases: पुण्यात डेंग्यूचा वाढता विळखा; चार महिन्यांत २२ रुग्ण, नगर रोड-वडगाव शेरी सर्वाधिक हॉटस्पॉट

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या वरिष्ठ पथकाने यासंदर्भात नुकतीच पुणे विमानतळावर प्रत्यक्ष पाहणी पूर्ण केली. या प्रस्तावित व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक आणि पाहणी दौरा पार पडला.

Pune Airport Hub And Spoke Model
Pune Illegal Injection Sale: पुण्यात नशेसाठी इंजेक्शनची बेकायदा विक्री उघड; पाच जण अटकेत, ५० मेफिवान इंजेक्शन जप्त

यामध्ये नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, इमिग्रेशन विभाग, कस्टम्स विभाग आणि विविध विमान कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या बैठकीत हब अँड स्पोक मॉडेलची कार्यपद्धती, सुरक्षितता, प्रवासी सुविधा आणि आवश्यक तांत्रिक बदलांवर चर्चा झाली. त्यानंतर पथकाने विमानतळ परिसरातील प्रवासी प्रक्रिया क्षेत्र, टर्मिनल सुविधा आणि सुरक्षेची पाहणी केली.

Pune Airport Hub And Spoke Model
Kesanand Solid Waste Management Project: केसनंद ग्रामपंचायतीत कचऱ्याचे आंदोलन; २.११ कोटींच्या घनकचरा प्रकल्पातील कथित भ्रष्टाचारावर संताप

प्रवाशांना होणारे प्रमुख फायदे

  • मुंबई किंवा दिल्लीसारख्या मुख्य हब विमानतळावर पोहचल्यानंतर तेथील इमिग्रेशन आणि कस्टम्सच्या लांब रांगांत उभे राहावे लागणार नाही.

  • पुण्याहून तपासणी पूर्ण झाली असल्यामुळे मुख्य विमानतळावरून पुढील कनेक्टिंग फ्लाइट पकडणे अधिक सोपे आणि जलद होईल.

  • या मॉडेलमुळे पुणे विमानतळाची क्षमता वाढणार असून, भविष्यात नवीन आंतरराष्ट्रीय मार्गांना आणि उड्डाणांना प्रोत्साहन मिळेल.

Pune Airport Hub And Spoke Model
SPPU New Courses: पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय! सात नवे उद्योगाभिमुख अभ्यासक्रम सुरू; ड्रोन, ईव्ही, रोबोटिक्सला प्राधान्य

पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून परदेशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. हब अँड स्पोक मॉडेलमुळे पुणे विमानतळावरील सुविधा अधिक सक्षम होणार आहेत. परदेशात उड्डाण करणाऱ्या प्रवाशांची इमिग्रेशन आणि कस्टम तपासणी पुणे विमानतळावरच पूर्ण होणार असल्याने मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळांवर (हब) त्यांचा वेळ वाचेल आणि प्रवाशांना विनाअडथळा परदेशात प्रवास करता येईल. यासंदर्भात मंत्रालय आणि संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर आढावा घेतला असून, पायाभूत सुविधांची पुणे विमानतळावर पाहणी केली आहे. लवकरच याची अंमलबजावणी केली जाईल.

संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news