Investment Fraud
Investment FraudPudhari

Pune Investment Fraud: पाण्याच्या प्लांट गुंतवणुकीत 2.34 कोटींची फसवणूक; बाप-लेकांवर गुन्हा

लोणी काळभोरमध्ये प्रकार; नातेवाईकांकडूनच पेट्रोल पंप व्यावसायिकाला गंडा
Published on

पुणे: पाण्याच्या प्लांटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याची बतावणी करीत बाप-लेकांनी पेट्रोल पंप व्यावसायिकाला तब्बल 2 कोटी 34 लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना 1 डिसेंबर 2024 ते 19 मार्च 2026 कालावधीत कदमवाक वस्ती लोणी काळभोरमध्ये घडली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Investment Fraud
Pune Government Hospital: पुण्यात एमआरआय-सीटी स्कॅनची कमतरता; गरीब रुग्णांची परवड

प्रतीक राजेश काबरा, रोहित राजेश काबरा, राजेश सत्यनारायण काबरा (तिघेही रा. त्रिवेणीनगर, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आनंद लाहोटी (रा. हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार लाहोटी हे पेट्रोल पंप व्यावसायिक असून, हडपसरमध्ये राहायला आहेत.

Investment Fraud
Maharashtra 11th Admission Process: अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा ऑनलाइन; विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्रे सुरू

आरोपी काबरा हे त्यांचे नातलग असून, त्यांचा ‌‘द रुबाबदार‌’ नावाने कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. तसेच बाटलीबंद पाणी विक्रीचाही ते व्यवसाय करतात. आरोपी काबरा यांनी लाहोटी यांना पाण्याच्या व्यवसायात भागीदारी करण्यास भाग पाडले. त्यानुसार 17 फेबुवारी 2025 मध्ये त्यांच्यात ए. पी. बेव्हरेजेस नावाने भागीदारी करार झाला.

Investment Fraud
Pune Stray Dogs Issue: पुण्यात भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव; फीडिंग पॉइंट धोरणावर प्रश्नचिन्ह

त्यांच्याकडून पाणी प्लान्टमध्ये 1 कोटी 78 लाख 75 हजारांची गुंतवणूक करून घेतली. त्यानंतर आरोपींनी जून ते ऑक्टोबर 2025 कालावधीत विक्री झालेल्या पाणी बॉटल व्यवहारातील 55 लाख 48 हजार रुपये स्वतःच्या बँक खात्यात वर्ग केले.

Investment Fraud
Narayanagaon Tamasha Pandhari: नारायणगावच्या तमाशा पंढरीत कोट्यवधींची उलाढाल; हंगामाला जोरदार प्रतिसाद

आरोपींनी लोणी काळभोरमधील कदमवाकवस्तीवर नव्याने उभारलेल्या प्लान्टमधील मशीन्स तक्रारदार लाहोटी यांच्या परवानगीशिवाय विक्री केल्या. दोघा भावंडांसह त्यांच्या वडिलांनी डिसेंबर 2024 मार्च 2025 कालावधीत तक्रारदार लाहोटी यांची मिळून 2 कोटी 34 लाख 23 हजारांची फसवणूक केल्याचे फिर्यादित नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news