Pune Water Cut: पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! गुरुवारी शहरातील बहुतांश भागांचा पाणीपुरवठा बंद

जलकेंद्रांतील तातडीच्या देखभाल-दुरुस्तीमुळे २४ तास पाणीबंद; शुक्रवारी कमी दाबाने व उशिरा पाणीपुरवठ्याची शक्यता
Water Supply
Water SupplyPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील विविध जलकेंद्रांमध्ये विद्युत, पंपिंग व स्थापत्यविषयक तातडीची देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने गुरुवारी (दि. १०) शहरातील बहुतांश भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवार (दि.९) मध्यरात्री १२ ते गुरुवार मध्यरात्री १२ या २४ तासांच्या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहणार असून, शुक्रवारी (दि.११) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.

Water Supply
Vidyanand Bapat: डीजेविरोधातील आवाज ठरला ‘व्हायरल’; सामान्य पुणेकर विद्यानंद बापट देशभर चर्चेत

जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, पर्वती एचएलआर झोन, भामा आसखेड जॅकवेल, वारजे जलकेंद्र आदींच्या अखत्यारीतील भागांना या पाणीबंदचा फटका बसणार आहे. पर्वती एचएलआर परिसरातील सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरचा काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर, इंदिरानगर, पर्वती गावठाण, कोंढवा खुर्द आदी भागांचा पाणीपुरवठा बंद राहील.

Water Supply
Pune Ganeshotsav Procession: पुण्याचा गणेशोत्सव बदलला; देखाव्यांपासून मिरवणुकीपर्यंतचा १६०० मंडळांचा प्रवास

नागरिकांनी सहकार्य करावे

भामा आसखेड जलकेंद्रांतर्गत लोहगाव, कळस-धानोरी, टिंगरेनगर, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, येरवडा, खराडी तसेच आळंदी नगर परिषद परिसरातही पाणीपुरवठा खंडित होणार आहे. एसएनडीटी (एचएलआर) अंतर्गत गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ, लॉ कॉलेज रोड, बाणेर, सेनापती बापट रस्ता, पौड रस्ता, मयूर कॉलनी, कर्वे रस्ता, वारजे आदी भाग प्रभावित होतील.

Water Supply
Pune Ukadiche Modak: गणरायाच्या आगमनाआधीच उकडीच्या मोदकांना मागणी; पुण्यात आगाऊ ऑर्डर्स फुल्ल

चांदणी चौक टाकी परिसरातील पाषाण, बावधन, सूस रोड, भूगाव रोड; गांधी भवन टाकीअंतर्गत कोथरूड, कर्वेनगर, हिंगणे, वारजे-माळवाडी; तसेच बाणेर-बालेवाडी परिसरातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याशिवाय लष्कर विभागातील लुल्लानगर, कोंढवा, एनआयबीएम, वानवडी, साळुंखे विहार, नवीन-जुने होळकर जलकेंद्रांतर्गत खडकी परिसर, कोंढवे-धावडे, शिवणे, उत्तमनगर.

Water Supply
Pune Dahi Handi Noise Pollution: पुण्यात दहीहंडीचा डीजेचा दणदणाट कमी; १,१०० मंडळांचे ‘साउंड रीडिंग’, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

तसेच वडगाव जलकेंद्रांतर्गत कात्रज, धनकवडी, धायरी, सिंहगड रस्ता, आंबेगाव, कोंढवा, येवलेवाडी आदी विस्तृत भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा व पाणीपुरवठा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news