Vidyanand Bapat: डीजेविरोधातील आवाज ठरला ‘व्हायरल’; सामान्य पुणेकर विद्यानंद बापट देशभर चर्चेत

अवघ्या १० ते १५ दिवसांत प्रसिद्धीचा आलेख पुण्यापासून देश-विदेशापर्यंत; हल्ल्यानंतर माध्यमांमध्ये चर्चेला आणखी उधाण
Vidyanand Bapat
Vidyanand BapatPudhari
Published on
Updated on

पुणे: पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणारे नारायण पेठेतील सामान्य नागरिक विद्यानंद बापट यांची माध्यम दृष्यमानता प्रचंड वाढली आहे. अवघ्या दहा ते पंधरा दिवसांत सामान्य पुणेकर ते सर्वाधिक चर्चेतील व्यक्ती अशी प्रतिमा झाली. पुणे शहरासह अवघे राज्य, देश आणि सातासमुद्रापार असणाऱ्या मराठी बांधवांत त्यांची लोकप्रियता वाढली आहे. त्यावर सांखिकी पद्धतीने दै. 'पुढारी'ने केलेला हा खास रिपोर्ट...

Vidyanand Bapat
Pune Ganeshotsav Procession: पुण्याचा गणेशोत्सव बदलला; देखाव्यांपासून मिरवणुकीपर्यंतचा १६०० मंडळांचा प्रवास

गत पंधरा ते वीस दिवसांचा प्रिंट, ऑनलाईन आणि न्यूज चॅनेलचा ट्रेंड काही ॲप तपासत आहेत. त्यावरून असे दिसते की, विद्यानंद बापट यांचे अस्खलीत मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व पाहून त्यांचे व्हिडीओ सर्वाधिक ऐकले जात आहेत. २४ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालवाधीतील हा सांख्यिकी ट्रेंड काही ॲपने तपासला. बापट यांच्या प्रसिद्धीचा प्रवास खरोखरच रंजक आहे.

Vidyanand Bapat
Pune Ukadiche Modak: गणरायाच्या आगमनाआधीच उकडीच्या मोदकांना मागणी; पुण्यात आगाऊ ऑर्डर्स फुल्ल

रंजक निष्कर्ष...

  • २४ ऑगस्टला बापट हे प्रामुख्याने पुण्यातील एका विषयावर बोलणारे नागरिक होते. २९ ऑगस्टपर्यंत ते महाराष्ट्रातील चर्चेतील व्यक्ती झाले.

  • ३ ते ४ सप्टेंबरपासून राष्ट्रीय माध्यमांमध्येही त्यांचा उल्लेख होऊ लागला. त्यांच्या प्रसिद्धीचा ग्राफ स्थानिक राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असा वर चढताना दिसतो.

  • पुण्याचा गणेशोत्सव हा शहरासह राज्य, देश आणि आंतराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असल्याने बापटांना माध्यमांत प्राईम टाईमची प्रचंड स्पेस मिळाली. त्यांच्यावर झालेला हल्ला हा त्यांच्या प्रसिद्धीचा मुख्य 'ब्रेकिंग पॉइंट' ठरला.

Vidyanand Bapat
Pune Dahi Handi Noise Pollution: पुण्यात दहीहंडीचा डीजेचा दणदणाट कमी; १,१०० मंडळांचे ‘साउंड रीडिंग’, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

असा वाढला प्रसिद्धी निर्देशांक...

  • पहिला टप्पा: पुणे: २४ ऑगस्टच्या पुणे महापालिकेतील गणेशोत्सवपूर्व बैठकीत बापट यांनी डीजे आणि कर्णकर्कश लाउडस्पीकरच्या वापराचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर त्यांची भूमिका स्थानिक माध्यमांमध्ये झपाट्याने चर्चेत आली. पुण्यात प्रचंड चर्चेत आले.

  • दुसरा टप्पा: महाराष्‍ट्रभर प्रसिद्धी: २८ ते ३१ ऑगस्टदरम्यान त्यांच्या मुलाखती, भाषणे आणि डीजेविरोधातील भूमिका मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाली. अनेक माध्यमांवर त्यांचा वैशिष्टपूर्ण संवाद, भाषेवरील प्रभुत्व अन् मुद्दा मांडण्याची पद्धत आवडल्याने ते राज्यभर प्रसिद्ध झाले.

Vidyanand Bapat
Sugarcane Department Development: ऊसविकास विभागाला मिळणार बळकटी; साखर आयुक्तालयात १०३ अधिकारी-कर्मचाऱ्यांची मागणी
  • तिसरा टप्पा: देशात व्‍हायरल: त्यांच्या संस्कृत सुभाषितांच्या वापरामुळे त्यांची भाषाशैलीही चर्चेचा विषय बनली. माध्यमांनी त्यांच्या भाषेची स्वतंत्रपणे दखल घेत घरी गर्दी केली. अन् ते सतत ट्रेंडिंग राहिल्याने देशात प्रसिद्धी मिळू लागली.

  • चौथा टप्पा: हल्‍ला टर्निंग पाॅइंट, विदेशात चर्चा: पुण्यातील टिळक रस्त्यावर माध्यमांशी बोलत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. या घटनेने त्यांच्या दृष्यमानतेच्या आलेखाला राज्यव्यापी आयाम मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस श.प.) यांच्या प्रतिक्रियांमुळे बापट यांचे नाव केवळ पुण्यातील ध्वनिप्रदूषणाच्या चर्चेत राहिले नाही, तर राज्याच्या चौकटी तोडून विदेशांत गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news