Pune Ukadiche Modak: गणरायाच्या आगमनाआधीच उकडीच्या मोदकांना मागणी; पुण्यात आगाऊ ऑर्डर्स फुल्ल

दहा दिवसांसाठी मोठ्या प्रमाणावर नोंदणी; गूळ, नारळ, तांदूळ, मजुरी व गॅस महागल्याने मोदकांच्या दरात ५ रुपयांची वाढ
Modak
ModakPudhari
Published on
Updated on

पुणे: ताटात सजलेले गरमागरम उकडीचे मोदक... त्यातून दरवळणारा सुगंध अन्‌ बाप्पाच्या नैवेद्याची आतुरता! गणरायाच्या आगमनाआधीच मोदकांच्या आगाऊ नोंदणीसाठी पुणेकरांची लगबग सुरू झाली असून, यंदाही गणेशोत्सवातील दहा दिवस नैवेद्य दाखवण्यासाठी उकडीच्या मोदकांना मोठी मागणी आहे. गेल्या महिनाभरापासून आगाऊ नोंदणी सुरू असून, पहिल्या दिवसासह संपूर्ण दहा दिवसांसाठी मोठ्या प्रमाणावर ऑर्डर मिळत आहेत. मागणी क्षमतेपेक्षा अधिक झाल्याने काही व्यावसायिकांनी नवीन नोंदणी बंद केली असून, काहींकडे अद्यापही ऑर्डर स्वीकारल्या जात आहेत.

Modak
Pune Dahi Handi Noise Pollution: पुण्यात दहीहंडीचा डीजेचा दणदणाट कमी; १,१०० मंडळांचे ‘साउंड रीडिंग’, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

दर वर्षी मोदक बनणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. प्रामुख्याने हा व्यवसाय महिला - तरुणींकडून केला जात आहे. यंदा घरगुती गणपतींपासून सोसायट्या, गणेश मंडळे, केटरिंग व्यावसायिक, हॉटेल, डायनिंग हॉल, कंपन्या आणि विविध संस्थांकडून मोठ्या प्रमाणात मोदकांची मागणी होत आहे. व्यावसायिकांकडे मोठ्या प्रमाणात आगाऊ नोंदणी केली जात असून, उपलब्ध मनुष्यबळ आणि उत्पादन क्षमतेनुसारच नोंदणी स्वीकारली जात आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतूनही मोदकांसाठी मागणी येत असल्याने व्यावसायिकांची तयारीची लगबग सुरू झाली आहे. यंदा प्रत्यक्ष दुकानात तसेच ऑनलाइन माध्यमातूनही मोदकांची नोंदणी होत आहे.

Modak
Sugarcane Department Development: ऊसविकास विभागाला मिळणार बळकटी; साखर आयुक्तालयात १०३ अधिकारी-कर्मचाऱ्यांची मागणी

व्यावसायिक ज्योती गोडबोले म्हणाल्या, की यंदा उत्सावातील दहा दिवसांच्या कालावधीतील आगाऊ नोंदणी पूर्ण झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उकडीच्या मोदकांची मागणी जवळपास दुप्पट आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत उत्पादन करणे शक्य होत नसल्याने दिवसभरात जेवढे मोदक तयार करता येतात, तेवढ्याच मोदकांची नोंदणी आम्ही घेत आहोत. घरातील पाच-सहा सदस्यांसह कामगारांच्या मदतीने मोदक तयार केले जातात. उत्सवाच्या काळात रोज चार ते पाच हजार मोदक तयार होतात. सध्या आमच्याकडे एका मोदकाची किंमत ३५ रुपये आहे.

Modak
Pune Metro: पुणे मेट्रोचा वेग वाढणार! आता दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो; ट्रायल रन यशस्वी

मोदकांच्या किमतीत ५ रुपयांची वाढ

यंदा उकडीच्या मोदकासाठी ३५ ते ४० रुपये मोजावे लागत आहेत. मागील वर्षी हाच मोदक ३० रुपयांना मिळत होता. मोदकासाठी लागणारा गूळ, साखर, तांदूळ आणि नारळाच्या दरात वाढ झाली आहे. त्यातच मजुरी आणि गॅसच्या खर्चातही वाढ झाल्याने मोदकांच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, दरवाढ होऊनही मागणी कमी झालेली नसून, उलट गेल्या वर्षीच्या तुलनेत ती वाढल्याचे व्यावसायिक सांगतात.

Modak
Government Recruitment Exam Reform: सरकारी भरती परीक्षांमध्ये गैरप्रकारांना आळा; परीक्षा पद्धतीचा सर्वंकष आढावा घेणार

यंदाही मोदकांना मोठ्या प्रमाणावर मागणी मिळत असून, ती पूर्ण करण्यासाठी तयारीला सुरुवात केली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी साधारणपणे ५० हजार मोदकांची विक्री होते. सध्या एका मोदकाची किंमत ३० रुपये ठेवली आहे. लोकांना परवडेल अशा दरात मोदक देण्याचा प्रयत्न आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही हा व्यवसाय करीत असून, कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने मोदक तयार केले जातात.

संताजी माने, व्यावसायिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news