Pune Police Constable Extortion Case: कारवाईची भीती दाखवून मोटारचालकाकडे ५ हजारांची मागणी; पोलिस शिपायाला अटक!

वारजेतील डुक्करखिंड परिसरात महामार्गावर कार अडवून पैशांची मागणी; मोटारचालकाच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल
Police
PolicePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: कारवाईची भीती दाखवून मोटारचालकाकडे पाच हजार रुपयांची मागणी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला वारजे पोलिसांनी अटक केली. बाबूराव पोपट ढोले (वय ३३) असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे.

Police
Pune Sarasbaug Case: सारसबागेत कारमध्ये आढळला पाच दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह; परिसरात खळबळ!

याप्रकरणी, मोटारचालक शिवकुमार बच्चूलाल सरोज (वय २३, रा. अचलपूर, प्रयागराज, उत्तर प्रदेश) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ढोले याच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Police
AI Bot Trading Crypto Fraud: एआय बॉट ट्रेडिंग, क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषाने १४.७० कोटींचा गंडा; २३ जणांवर गुन्हा!

तक्रारदार सराजे हे (दि.२९) रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन निघाले होते. त्या वेळी डुक्करखिंड परिसरात पोलिस शिपाई ढोले याने मोटार अडविली. मोटारचालक सरोज याला धमकावले.

Police
Pune Water Conservation: पुणे जिल्ह्यात जलसंधारणाला गती; पाझर तलाव, बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी आराखडा तयार!

कारवाईची भीती दाखविली, तसेच माेटार जप्त करण्याची धमकी दिली. सराेज याला धमकावून पोलिस शिपाई काळे याने पाच हजार रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या सरोज यांनी वारजे पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

Police
Mulshi Dam Water Diversion: मुळशी धरणाचे पाणी सोलापूरकडे वळवणार? ५०० कोटींच्या बोगद्याचा प्रस्ताव चर्चेत!

पोलिसांनी काळे याला ताब्यात घेतले. चौकशीत मोटारचालकाला धमकावून पैशांची मागणी केल्याचे उघडकीस आल्यानंतर अटक करण्यात आली. ढोले याची नेमणूक मुख्यालयात आहे. असे असताना देखील तो महामार्गावर पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होता. पोलिस उपनिरीक्षक सिद्धेश्वर रायगोंडा तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.