Pune Ward Committee Elections Results: पुणे प्रभाग समिती निवडणुकीत भाजपचे वर्चस्व

15 पैकी 13 अध्यक्षपदे भाजपकडे; महिला नेतृत्वाची ठळक नोंद
BJP
BJPPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मंगळवारी पार पडलेल्या या निवडणुकीत 15 पैकी तब्बल 13 अध्यक्षपदे भाजपकडे गेली, तर राष्ट्रवादी काँग््रेास व काँग््रेासला प्रत्येकी एक जागा मिळाली. तेरा प्रभाग समित्यांमध्ये निवडणूक बिनविरोध पार पडली. पालिकेच्या सभागृहाप्रमाणेच या निवडणुकीतही महिला प्रतिनिधित्व ठळकपणे समोर आले.

BJP
Baramati Bypoll EVM VVPAT: बारामती पोटनिवडणूक: ईव्हीएम-व्हीव्हीपॅट कमिशनिंग पूर्ण

मनपा भवन येथे अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. भाजप आणि राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार गट) यांनी एकत्रितपणे ही निवडणूक लढवली. नगर रोड-वाघोली प्रभाग समितीत अनिल सातव (भाजप), छत्रपती शिवाजीनगर-घोले रोडमध्ये अमृता म्हेत्रे (भाजप), औंध-बाणेरमध्ये रोहिणी चिमटे (भाजप), कोथरूड-बावधनमध्ये वासंती काकडे (भाजप),

BJP
Pune Car Bazaar Scam: पुण्यात ‘कार बाजार’ घोटाळा; बनावट आरसी, कर्जफसवणुकीने खळबळ

वारजे-कर्वेनगरमध्ये मंजूषा खर्डेकर (भाजप), सिंहगड रोडमध्ये सचिन मोरे (भाजप), धनकवडी-कात्रज-आंबेगावमध्ये प्रतिभा चोरघे (भाजप), कोंढवा-उंड्रीमध्ये रंजना टिळेकर (भाजप), हडपसर-मांजरीमध्ये प्रशांत तुपे (भाजप), बिबवेवाडीमध्ये मनीषा चोरबेले (भाजप), कसबा पेठमध्ये उज्ज्वला यादव (भाजप) तसेच

BJP
Sinhagad Illegal Mining: सिंहगड पायथ्याशी डोंगरफोड व वृक्षतोडीचा आरोप

विश्रामबागवाडा प्रभाग समितीत राघवेंद्र मानकर (भाजप) यांची बिनविरोध निवड झाली. वानवडी प्रभाग समितीत ॲड. साहिल केदारी (काँग््रेास) यांचीही बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली.

BJP
Mulshi Ring Road Farmer Demolition: मुळशी रिंगरोडसाठी शेतकऱ्याचे घर-गोठा जमीनदोस्त

दरम्यान, येरवडा-वडगाव शेरी प्रभाग समितीमध्ये चुरशीची लढत झाली. भाजपच्या कविता गलांडे यांनी काँग््रेासचे विशाल मलके यांचा 8 विरुद्ध 4 मतांनी पराभव केला तसेच ढोले पाटील रोड प्रभाग समितीत राष्ट्रवादी काँग््रेासच्या सुरेखा कवडे यांनी काँग््रेासच्या वैशाली भालेराव यांना 5 विरुद्ध 3 मतांनी पराभूत करीत अध्यक्षपद पटकाविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news