Pune Ward 2 Redevelopment: विकासकामे झाली तरी समस्या कायम; प्रभाग २ मध्ये झोपडपट्टी व म्हाडा पुनर्विकासाचा खोळंबा

विश्रांतवाडी परिसरात वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि पुरग्रस्तांचे पुनर्वसन प्रलंबित; नागरिक नाराज, पुढाकाराची गरज
विकासकामे झाली तरी समस्या कायम; प्रभाग २ मध्ये झोपडपट्टी व म्हाडा पुनर्विकासाचा खोळंबा
विकासकामे झाली तरी समस्या कायम; प्रभाग २ मध्ये झोपडपट्टी व म्हाडा पुनर्विकासाचा खोळंबाPudhari
Published on
Updated on

संतोष निंबाळकर, मुकुंद कदम

लेनगर-नागपूर चाळ या प्रभाग क्र. २ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेले सुनील टिंगरे यांना आमदारपदाची संधी मिळाली, तर सिद्धार्थ चेंडे यांच्या रूपाने वा प्रभागाला उपमहापौराची संधी मिळाली. सुमारे तेरा छोट्या-मोठ्या झोपडपट्ट्या, सात सरकारी कार्यालये व तेथील कर्मचाऱ्यांच्या वसाहती, मुळा नदीकाठचा पूास्त भाग, येरवडा कारागृह, सीबीआय कार्यालय, सर्व्हे ऑफ इंडिया अशी महत्वाची संवेदनशील ठिकाणे, काही दशके जुन्या म्हाडाच्या इमारती, त्याचबरोबर कस्तुरबावाडी सोसायटी, महालक्ष्मी विहार, विद्यानगर, हरिगंगा सोसायटी असा उच्च मध्यमवर्गीय परिसर, यांचा प्रभाग २ मध्ये समावेश आहे. त्यामुळे इथल्या समस्याही वेगवेगळ्या आणि गुंतागुंतीच्या आहेत. त्यातच मागील साडेतीन वर्षांमध्ये प्रशासकराजमुळे विकासकामे वेळेवर होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.(Latest Pune News)

विकासकामे झाली तरी समस्या कायम; प्रभाग २ मध्ये झोपडपट्टी व म्हाडा पुनर्विकासाचा खोळंबा
Pune Ward 2 Election: भाजपपुढे आव्हान : राष्ट्रवादी काँग्रेससोबत रंगणार सामना

विद्यानगर-नागपूर चाळ, विश्रांतवाडी चौक परिसर, आरटीओ कार्यालय परिसरात पथारी व्यावसायिकांची शेकडो अतिक्रमणे आहेत. मुख्य रस्त्यावरील वाहनांच्या पार्किंगने पदपथ आणि मुख्य रस्ते गिळंकृत करून टाकले आहेत. माननीयांकडून मात्र याविषयी बोटचेपे धोरण अवलंबिले जात असल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे.

या प्रभागात छोट्या-मोठ्या तेरा झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला नाही. सावंत पेट्रोल पंप व कॉमर्स झोन चौकातील सिग्रल म्हणजे 'असून अडचण नसून खोळंबा' अशी अवस्था आहे. विश्रांतवाडी चौकात उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटरचे काम व पथारी व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. अग्रसेन हायस्कूलजवळील डीपी रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. मुळा नदीकाठच्या आदर्श इंदिरानगर, शांतीनगर व परिसरातील पुरस्थिती आणि पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रत्र कळीचा मुद्दा आह

विकासकामे झाली तरी समस्या कायम; प्रभाग २ मध्ये झोपडपट्टी व म्हाडा पुनर्विकासाचा खोळंबा
Nagari Sanghatana Pune: नागरी संघटनेच्या वर्चस्वाचा काळ

म्हाडाच्या घरांच्या पुनर्वसनप्रकरणी माननीयांनी पुढाकार घ्यावा, अशी नागरिकाची मागणी आहे. कारागृह, पाटबंधार मनोरुणालय, अशा सात राज्य सरकारी कार्यालये व कर्मचाप्याच्या वसाहतीमध्ये सरकारी नियमामुळे पाणीपुरवठा वगळता इतर सुविधा पुरविताना महापालिकेला मयांदा येतात.

प्रभागात या भागांचा समावेश

नागपूरचा चाळ, महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड, आंबेडकर सोसायटी, राम सोसायटी, फुलेनगर, साप्रस, शांतीनगर, प्रतीक नगर, पंचशील नगर, सैनिक नगर, विश्रांतवाडी, कस्तुरबावाडी सोसायटीचा काही भाग तसेच विद्यानगर या भागांचा समावेश आहे.

विकासकामे झाली तरी समस्या कायम; प्रभाग २ मध्ये झोपडपट्टी व म्हाडा पुनर्विकासाचा खोळंबा
Tamasha Artists Maharashtra: दीड वर्षापासून तमाशा कलावंत मानधनापासून वंचित; शासनाच्या दुर्लक्षामुळे आर्थिक संकट

प्रभागात दोन पाण्याच्या टाक्यांची उभारणी केली. आठ एकरांमध्ये उद्यानाची निर्मिती केली. मुळा नदीकाठच्या पूग्रस्तांच्या पुनर्वसनाची मागणी आहे. माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या माध्यमातून विश्रांतवाडीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. आगामी काळात अद्ययावत रुग्णालय, वारकरी भवन, सुसज्ज ई-लायब्ररी उभारण्याचे नियोजन आहे.

शीतल सावंत, माजी नगरसेविका

कॉमर्स झोन ते अग्रसेन शाळा, कॉमर्स झोन ते सावंत पेट्रोल पंप व विश्रांतवाडी-फाइव्ह नाइन हे रस्ते केले. विश्रांतवाडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटरसाठी ६४ कोटी तसेच धानोरी नाल्यातील ड्रेनेजलाइनसाठी जायका प्रकल्पाच्या माध्यमातून ५६ कोटींची कामे सुरू आहेत. प्रभागातील पावसाळी वाहिन्यांची कामे केली.

सुनील टिंगरे, माजी आमदार (वडगाव शेरी मतदारसंघ) आणि माजी नगरसेवक

टिंगरेनगर येथील समाजमंदिराचे काम केले. महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथे हर्बल उद्यान विकसित केले. अग्रसेन शाळा ते कॉमर्स झोन रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. झोपडपट्ट्या, पूरग्रस्तांचे पुनर्वसन तसेच म्हाडाच्या घरांच्या पुनर्विकासासाठी पाठपुरावा सुरू आहे.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, महापालिका

विकासकामे झाली तरी समस्या कायम; प्रभाग २ मध्ये झोपडपट्टी व म्हाडा पुनर्विकासाचा खोळंबा
Bandu Andekar Gang: बंडू आंदेकरने स्वतःच्या नातवाला मारले, तो मलाही मारणार!

प्रभागातील प्रमुख समस्या

मुळा नदीकाठी पुराचा धोका व पूरग्रस्तांचे पुनर्वसन

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडले

पदपथ व मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण

वाहतूक कोंडी

नाल्यातून वाहणारे सांडपाणी

विकासकामे झाली तरी समस्या कायम; प्रभाग २ मध्ये झोपडपट्टी व म्हाडा पुनर्विकासाचा खोळंबा
Pune Rainfall Record: सहा महिने सलग पाऊस; 2019 नंतरचा सर्वांत मोठा पावसाळा

प्रभागात झालेली प्रमुख कामे

आळंदी रस्त्यावर वीस दशलक्ष लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी

चांगले व प्रशस्त मुख्य रस्ते

अंतर्गत रस्त्यांची सुविधा

जलतरण तलावाची सुविधा

चांगले कचरा व्यवस्थापन

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध

विश्रांतवाडी चौकात उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटरचे काम सुरू

आठ एकरांतील पाम उद्यान, हर्बल उद्यान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news