Pune Ward 2 Election: भाजपपुढे आव्हान : राष्ट्रवादी काँग्रेससोबत रंगणार सामना

युतीच्या भवितव्यावर ठरणार समीकरणे
भाजपपुढे आव्हान : राष्ट्रवादी काँग्रेससोबत रंगणार सामना
भाजपपुढे आव्हान : राष्ट्रवादी काँग्रेससोबत रंगणार सामनाPudhari
Published on
Updated on

खडाखडी प्रभाग क्रमांक : २ फुलेनगर-नागपूर चाळ

गत निवडणुकीत तीन जागा जिंकणाऱ्या भाजपच्या तीनही माजी नगरसेवकांनी वेगवेगळ्या वाटा धरल्याने प्रभाग क्र. २ मध्ये भाजपपुढे या वेळी मोठे आव्हान असणार आहे. महायुती न झाल्यास भाजपला राष्ट्रवादी काँग्रेससोबत सामना करावा लागेल, तर मुस्लिम आणि दलित मतदारांची संख्या लक्षात घेता महाविकास आघाडीलाही या प्रभागात दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे या प्रभागातील निवडणूक चुरशीची होणार आहे.(Latest Pune News)

भाजपपुढे आव्हान : राष्ट्रवादी काँग्रेससोबत रंगणार सामना
Nagari Sanghatana Pune: नागरी संघटनेच्या वर्चस्वाचा काळ

नागपूर चाळ, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, आंबेडकर सोसायटी, अहिल्या सोसायटी, राम सोसायटी, फुलेनगर, सात्रस, शांतीनगर, प्रतीकनगर, पंचशीलनगर, सैनिकनगर, विश्रांतवाडी व कस्तुरबावाडी सोसायटीचा काही भाग तसेच टिंगरेनगर, विद्यानगर या भागांचा समावेश प्रभाग क्र. २ मध्ये होतो. झोपडपट्टीबहुल प्रभाग, मुस्लिम मतदारांची मोठी संख्या व आंबेडकरी विचारांच्या उमेदवारांना निवडून देण्याचा या प्रभागाचा इतिहास असला, तरी भाजपने २०१७ मध्ये तीन ठिकाणी कमळ फुलविण्याची किमया केली होती. फक्त सुनील टिंगरे यांच्या रूपाने राष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती. भाजपकडून आमची लढाई महाविकास आघाडीच्या विचारांच्या उमेदवारांविरोधात आहे, असे चित्र रंगवले जात आहे.

या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या जागी त्यांचे बंधू सुहास टिंगरे मैदानात उतरणार आहेत. त्यांच्यासमवेत पॅनलमध्ये गत निवडणुकीत भाजपकडून नगरसेविका झालेल्या शीतल सावंत व माजी नगरसेविका अलका खाडे असतील, अशी शक्यता आहे. तसेच, राष्ट्रवादी काँगेसकडून विनोद पवार हेसुद्धा इच्छुक आहेत. या प्रभागात अनुसूचित जातीचे आरक्षण निश्चित असून, राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये एससी आरक्षित जागेवरून कोण निवडणूक लढविणार आणि चौथा उमेदवार कोण असेल, हे अद्याप गुलदस्तातच आहे. राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये सिद्धार्थ कांबळे, अजय बल्लाळ, महेश पाटील, किशोर भोंडे यांची नावे आहेत.

भाजपपुढे आव्हान : राष्ट्रवादी काँग्रेससोबत रंगणार सामना
Tamasha Artists Maharashtra: दीड वर्षापासून तमाशा कलावंत मानधनापासून वंचित; शासनाच्या दुर्लक्षामुळे आर्थिक संकट

गत महापालिका निवडणुकीत तीन जागा जिंकणाऱ्या भाजपपुढे या वेळेस मोठे आव्हान असणार आहे. तीनही माजी नगरसेवक आता भाजपसमवेत नाहीत. रिपाइंकडून भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविलेल्या माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी विधानसभा निवडणुकीत रिपाइंचा राजीनामा देत महायुतीविरोधात भूमिका घेतली होती. भाजपकडून रिपाइंवर अन्याय केला जात असल्याची भावना व्यक्त करीत त्यांनी महायुतीला मतदान न करण्याची प्रतिज्ञाच कार्यकत्यांसमवेत घेतली होती. त्यामुळे आता धेंडे नक्की कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार? याबाबत उत्सुकता आहे. त्यांची भूमिका या प्रभागात निर्णायक अशीच ठरणार आहे, तर भाजपच्या दुसऱ्या माजी नगरसेविका शीतल सावंत आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तिसऱ्या माजी नगरसेविका फरजाना शेख ह्यासुद्धा भाजपपासून दुरावल्या असून, त्याही कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार? हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे या प्रभागात भाजपकडून सर्व नवीन चेहरे येण्याची शक्यता आहे. इच्छुकांमध्ये मंगेश गोळे, सुभाष चव्हाण, राजकुमार बाफना, चंद्रकांत जंजिरे, राहुल जाधव, सुधीर वाघमोडे यांच्यासह माजी नगरसेवक अनिल टिंगरे यांचे बंधू विशाल टिंगरे यांच्याकडून चाचपणी सुरू आहे. तर, महिलावर्गातून रूपाली चव्हाण, हर्षदा जाधव, डॉ. स्नेहल वाघमोडे, स्यामा जाधव यांच्यासह पक्ष निश्चित नसलेल्या अदिती बाबर यांचे आव्हान असू शकते.

भाजपपुढे आव्हान : राष्ट्रवादी काँग्रेससोबत रंगणार सामना
Bandu Andekar Gang: बंडू आंदेकरने स्वतःच्या नातवाला मारले, तो मलाही मारणार!

या प्रभागात मुस्लिम आणि अनुसूचित जाती-जमातीच्या मतदारांची संख्या मोठी असल्याने महाविकास आघाडीला अनुकूल असे वातावरण होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून नाना नलावडे, निखिल गायकवाड, हर्षद जाधव, काँग्रेसच्या शिवानी माने निवडणुकीची तयारी करीत आहेत. माजी नगरसेवक हुलगेश चलवादी यांच्या कन्या रेणुका चलवादी शिर्के ह्याही इच्छुक असून, अद्याप त्यांचा पक्ष ठरलेला नाही. याशिवाय डॉ. भाग्यश्री दलाल-कदम, डॉ. योगेश कदम आदी इच्छुक उमेदवारांकडून तिकीट मिळविण्यासाठी फिलिंडग लावली जात आहे.

भाजपपुढे आव्हान : राष्ट्रवादी काँग्रेससोबत रंगणार सामना
Pune Rainfall Record: सहा महिने सलग पाऊस; 2019 नंतरचा सर्वांत मोठा पावसाळा

आरक्षण ठरणार निर्णायक

या प्रभागात एससी प्रवर्गाचे आणि ओबीसीचे आरक्षण नक्की कसे पडणार, यावर अनेक राजकीय गणिते ठरणार आहेत. एससी महिला आरक्षण पडल्यास डॉ. पेंडे यांच्यासह सर्व इच्छुकांची कोंडी होणार असून, ओबीसी पुरुष की महिला, यावरून अनेकांची उमेदवारी राहणार की जाणार, हे ठरणार आहे.

लोकसभेस आघाडीला, तर विधानसभेला महायुतीस मताधिक्य

गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रभाग क्र. २ मधून काँग्रेस आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना मताधिक्य मिळाले होते, तर सहा महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांना मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे आता हा प्रभाग कोणाला मताधिक्य देणार? याबाबत उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news