Pune Municipal Budget 2026: पुण्यात ‘शहरी गरीब आरोग्य योजना’ला अजितदादांचे नाव; उपचार मदत वाढणार

कॅन्सर व डायलिसिससाठी आर्थिक मर्यादा वाढविण्याचा निर्णय; महापालिकेची घोषणा
Ajit Pawar
Ajit PawarPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेने शहरातील गरीब रुग्णांसाठी राबविण्यात येणारी ‌‘शहरी गरीब आरोग्य योजना‌’ आता दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने ओळखली जाणार आहे. या योजनेचे नाव बदलून ‌‘स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शहरी गरीब आरोग्य योजना‌’ असे करण्यात आले आहे. महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही घोषणा केली.

Ajit Pawar
Pune Municipal Budget 2026: ‘फिट पुणे’साठी क्रीडा क्षेत्रात मोठी गुंतवणूक; हायपोक्सिक प्रशिक्षण केंद्र उभारणार

अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री, तसेच पुण्याचे पालकमंत्री होते. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विकासकामांना किंवा योजनांना त्यांचे नाव मिळावे, अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. महापालिकेच्या वतीने राबवली जाणारी शहरी-गरीब आरोग्य योजनेला अजित पवारांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी आता राष्ट्रवादी काँग््रेासने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Ajit Pawar
Pune Municipal Budget 2026: पुण्यात 75 महापालिका शाळा ‘रोल मॉडेल’; शिक्षण क्षेत्रात मोठा बदल

याबाबतचे पत्र विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी महापौर मंजूषा नागपुरे यांना दिले होते. त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे. याबद्दल माहिती देताना भिमाले म्हणाले, शहरी गरीब योजनेचे ‌‘स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शहरी गरीब योजना‌’ असे नामकरण करण्यात येत आहे.

Ajit Pawar
Pune Municipal Revenue Plan: पुणे महापालिकेचा 5 हजार कोटी उत्पन्नवाढीचा आराखडा; 1 एप्रिलपासून अंमलबजावणी

या योजनेचा सविस्तर फेरआढावा घेऊन ती अधिक सक्षम करण्यात येईल. योजनेतील त्रुटी दूर करून नव्याने काही आजारांचा समावेश करून अर्थसाह्य दिले जाईल. कर्करोगावरील उपचार आणि मूत्रपिंडाच्या आजाराने ग््रास्त रुग्णांना डायलिसिस उपचारांवरील मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात येईल.

Ajit Pawar
Pune Dog Park: भटक्या श्वानांचा प्रश्न कायम; पुण्यात ‘डॉग पार्क’ योजनेवरून वाद

योजनेअंतर्गत कॅन्सर रुग्णांना दोन लाख रुपये

गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी 2009 पासून ‌‘शहरी गरीब आरोग्य योजना‌’ राबविण्यात येत आहे. या योजनेतून आतापर्यंत हजारो नागरिकांवर आरोग्य उपचार झाले आहेत. स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग््रेासच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आली. या योजने अंतर्गत सध्या आपण वार्षिक उत्पन्न एक लाख 60 हजार रुपये असलेल्या पुणेकरांना एक लाख रुपयांपर्यंत उपचारासाठी अर्थसाहाय्य दिले जाते. तसेच, कॅन्सर रुग्णांसाठीही मर्यादा दोन लाख रुपये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news