Pune Municipal Budget 2026: ‘फिट पुणे’साठी क्रीडा क्षेत्रात मोठी गुंतवणूक; हायपोक्सिक प्रशिक्षण केंद्र उभारणार

क्रीडा नर्सरीपासून आधुनिक स्टेडियमपर्यंत उपक्रम; शहरात क्रीडासंस्कृतीला चालना
Sports
SportsPudhari
Published on
Updated on

पुणे: ‌‘फिट पुणे, फिट इंडिया‌’ या संकल्पनेला गती देत पुणे महानगरपालिकेच्या 2026-27 च्या अंदाजपत्रकात क्रीडा क्षेत्रासाठी व्यापक आणि दूरदृष्टीपूर्ण उपक्रमांची घोषणा केली आहे. क्रीडा नर्सरीपासून अत्याधुनिक हायपोक्सिक प्रशिक्षण सुविधांपर्यंत विविध स्तरांवर खेळाडू घडविण्याचा आराखडा यामध्ये मांडण्यात आला आहे.

Sports
Pune Municipal Budget 2026: पुण्यात 75 महापालिका शाळा ‘रोल मॉडेल’; शिक्षण क्षेत्रात मोठा बदल

स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी क्रीडा क्षेत्रासाठी मोठी आर्थिक तरतूद करीत शहरात क्रीडासंस्कृतीला चालना देण्यावर विशेष भर दिला आहे. बालवयातच क्रीडाकौशल्य विकसित व्हावे, यासाठी हडपसरसह शहरातील विविध भागांमध्ये क्रीडा नर्सरी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे भविष्यातील गुणवंत खेळाडू घडण्यास मदत होणार आहे.

Sports
Pune Municipal Revenue Plan: पुणे महापालिकेचा 5 हजार कोटी उत्पन्नवाढीचा आराखडा; 1 एप्रिलपासून अंमलबजावणी

पुणे महानगरपालिकेच्या पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमचा सर्वांगीण विकास करून तेथे आंतर राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये आधुनिक क्रीडा साहित्य, प्रगत प्रशिक्षण सुविधा आणि सरावासाठी आवश्यक पायाभूत व्यवस्था उभारण्यात येणार आहे. याचा विशेष लाभ शहराच्या मध्यवर्ती भागातील खेळाडूंना होईल.

Sports
Pune Dog Park: भटक्या श्वानांचा प्रश्न कायम; पुण्यात ‘डॉग पार्क’ योजनेवरून वाद

याचबरोबर गणेश कला क्रीडा रंगमंचाचेही आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. शहरातील विविध परिसरांमध्ये सुसज्ज आणि अद्ययावत क्रीडांगणे उभारून युवकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे क्रीडा क्षेत्रात सहभाग वाढण्यासोबतच नागरिकांमध्ये आरोग्यदायी जीवन शैलीची जाणीव निर्माण होणार आहे.

Sports
Pune Municipal Budget 2026: पुण्यात आरोग्य सेवांना मोठा बूस्ट; मल्टिस्पेशालिटी रुग्णालये, आयव्हीएफ व एमआरआय सुविधा

सुविधा उपलब्ध करून देणार

ॲथलेटिक्स, मॅरेथॉन, सायकलिंग आणि पर्वतारोहण यांसारख्या क्रीडाप्रकारांसाठी हायपोक्सिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असून, येथे वैज्ञानिक पद्धतीने प्रशिक्षण, तज्ज्ञ मार्गदर्शन, फिटनेस मोजमाप आणि कामगिरी विश्लेषणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. महापालिकेच्या क्रीडा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करीत शहराच्या वाढत्या विस्ताराचा विचार करून विविध भागांत क्रीडांगणे, बहुउद्देशीय क्रीडासंकुले, बॅडमिंटन कोर्ट, व्यायामशाळा, जलतरण तलाव आणि ओपन जिम उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news