Pune University Girls Hostel Safety: पुणे विद्यापीठात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; ३०० हून अधिक विद्यार्थिनी मध्यरात्री रस्त्यावर

विद्यार्थ्यांकडून गैरवर्तन झाल्याचा आरोप; दोघांचे शैक्षणिक विभाग व वसतिगृहातील प्रवेश निलंबित, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
Pune University Girls Hostel Safety
Pune University Girls Hostel SafetyPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिक्षण विभागातील काही विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत, संबंधित विद्यार्थ्यांनी माफी मागावी आणि मुलींच्या सुरक्षिततेची खात्री द्यावी, या मागणीसाठी विद्यार्थिनींनी रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आंदोलन सुरू केले.

Pune University Girls Hostel Safety
PMRDA Internal Roads: पीएमआरडीएचा मोठा निर्णय! मंजूर लेआऊटमधील अंतर्गत रस्ते प्राधिकरणाच्या ताब्यात देणे बंधनकारक

पहाटे ३.२५ च्या सुमारास ३०० हून अधिक विद्यार्थिंनी वसतिगृहाबाहेर पडून रस्त्यावर उतरल्या. या वेळी त्यांनी विद्यापीठ प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेविरोधात घोषणाबाजी केली. विद्यापीठाच्या शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थिनींची छेड काढल्याचा आणि तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Pune University Girls Hostel Safety
Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवारांचे वर्चस्व; अजितदादा पॅनेलचा २१-० ने विजय

चौकशी करून दोषींविरुद्ध कडक कारवाई

विद्यापीठ आवारात विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने विद्यापीठाने सदर बाब गांभीर्याने घेतली आहे. त्या अनुषंगाने सदर विद्यार्थ्यांविरुद्ध विद्यापीठामार्फत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येत असून, त्या दोन्ही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विभागातील व वसतिगृहातील प्रवेश तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात येत आहेत. या संपूर्ण प्रकाराची कुलगुरूंनी नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. असे देखील विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Pune University Girls Hostel Safety
Bhimashankar Sugar Factory: भीमाशंकर साखर कारखाना जानेवारी ते मार्चदरम्यान उसाला देणार जादा दर; मार्चमध्ये प्रतिटन ३,५७३ रुपये

आम्ही मुलींच्या वसतिगृहाचे सहाय्यक मुख्य रेक्टर प्रवीण तलाट यांना पदावरून हटविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, आम्हाला मुख्य रेक्टर सोनिया नागराळे यांचा राजीनामा प्राप्त झाला आणि तो आम्ही स्वीकारला. आता कठोर उपाययोजना केल्या जातील. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आम्ही एक कायदेशीर समितीही स्थापन करत आहोत आणि यात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news