PMRDA Internal Roads: पीएमआरडीएचा मोठा निर्णय! मंजूर लेआऊटमधील अंतर्गत रस्ते प्राधिकरणाच्या ताब्यात देणे बंधनकारक

रस्त्यांच्या सातबारा उताऱ्यावरही पीएमआरडीएचे नाव लागणार; खासगी मालकीचा दावा करून रस्ते अडवण्याच्या प्रकारांना बसणार आळा
PMRDA
PMRDA Pudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: मंजूर झालेल्या लेआऊटमधील अंतर्गत रस्ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ताब्यात देणे आता विकसकांना बंधनकारक करण्यात आले आहे. या रस्त्यांच्या सातबारा उताऱ्यावरही पीएमआरडीएच्या नावाची नोंद करावी लागणार आहे. त्यामुळे खासगी मालकीचा दावा करून अंतर्गत रस्ते अडवण्याच्या प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा आहे.

PMRDA
Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवारांचे वर्चस्व; अजितदादा पॅनेलचा २१-० ने विजय

तसेच, शेजारील भूखंडांना जोडरस्ते उपलब्ध होऊन नागरिकांच्या ये-जा करण्यातील अडचण दूर होण्यास मदत होणार आहे. काही जमीनमालक आणि विकासकांकडून मंजूर लेआउटमधील अंतर्गत रस्त्यांचा वापर रोखला जात असल्याच्या तक्रारी पीएमआरडीएकडे प्राप्त झाल्या होत्या. शेजारील भूखंडांना जोडणारे रस्ते अडवले जात असल्याने नागरिकांना वाहतुकीसाठी अडचणींचा सामना करावा लागत होता.

PMRDA
Bhimashankar Sugar Factory: भीमाशंकर साखर कारखाना जानेवारी ते मार्चदरम्यान उसाला देणार जादा दर; मार्चमध्ये प्रतिटन ३,५७३ रुपये

अनेक रस्त्यांच्या सातबारा उताऱ्यावर अद्यापही जमीनमालक किंवा विकसकांची नावे असल्याने रस्त्यांच्या वापराबाबत वाद निर्माण होत होते. या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाने परिपत्रक जारी करून रस्ते हस्तांतरणाची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार (यूडीसीपीआर) ही कार्यवाही केली जाणार आहे.

PMRDA
Pune Water Cut: पुण्यात दर गुरुवारी पाणीबंदी; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय

अंतिम मंजुरीनंतर रस्त्यांचा ताबा

लेआऊटला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित सहायक महानगर नियोजन अधिकारी अंतर्गत रस्त्यांची पाहणी करतील. विकासकाने मंजूर आराखड्यानुसार रस्त्यांची निर्मिती केली की नाही, याची खातरजमा झाल्यानंतर ताबा पावतीद्वारे रस्ते पीएमआरडीएकडे हस्तांतरित केले जातील. त्यानंतर सातबारा उताऱ्यावर प्राधिकरणाचे नाव नोंदवण्यासाठी संबंधित आदेशाची प्रत तहसीलदारांना पाठवण्यात येणार आहे.

PMRDA
Pune Navratri Festival: पुण्यात नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला; देवीदर्शनासाठी मंदिरांत गर्दी, दांडिया-गरबाची धूम

या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी संबंधित अर्जदार किंवा विकासकाची असेल. तसेच रस्ते हस्तांतरणासाठी येणारा खर्चही त्यांनाच करावा लागणार आहे. या निर्णयामुळे मंजूर लेआउटमधील रस्ते सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. मात्र, प्रत्यक्षात रस्ते हस्तांतरणाची प्रक्रिया किती प्रभावीपणे राबवली जाते. तसेच नियमांचे उल्लंघन करून रस्ते अडवणाऱ्यांवर काय कारवाई होते, यावर या निर्णयाचे यश अवलंबून राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news