SPPU Fake Degree Case: पुणे विद्यापीठात बनावट बी.कॉम पदवीचा धक्कादायक प्रकार; तीन लाखांच्या व्यवहाराचा आरोप

वित्त व लेखा विभागातील अधिकाऱ्यावर आरोप; सत्यशोधन समितीमार्फत चौकशी सुरू, दोषींवर कारवाईचे विद्यापीठाचे आश्वासन
SPPU Fake Degree
SPPU Fake DegreePudhari
Published on
Updated on

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वित्त व लेखा विभागातील एका अधिकाऱ्याने रिक्षाचालकाच्या मुलाला तीन लाखांत बनावट बी.कॉम ची पदवी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने विभागाअंतर्गत चौकशी समिती स्थापन केली असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. संबंधित पदवीमध्ये गोंधळ असल्याचे निदर्शनास आल्यानंतर रिक्षाचालकाने केलेल्या तक्रारीतून हे उघडकीस आले आहे.

SPPU Fake Degree
Chandane Gang Leader Arrested: 'चांदणे गँग'चा म्होरक्या जेरबंद; कोयता हल्ल्यानंतर वानवडीतून थरारक पाठलाग करून अटक

विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा खालावत असल्याचे रँकींगमध्ये उघडकीस येत असतानाच विद्यापीठात आता गैरप्रकार देखील जोर धरू लागल्याचे दिसून येत आहे. प्राध्यापक भरतीमध्ये गैरप्रकार होत असल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता चक्क बनावट पदवीच विद्यार्थ्याला देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे विद्यापीठाची प्रतिमा धुळीस मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

SPPU Fake Degree
Pune Rural Police Suspension: ₹१ कोटी दरोडा कटप्रकरणी दोन पोलिस निलंबित; आरोपींना मदत केल्याचा ठपका

विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातील अधिकारी रमेश मुखेकर यांच्या विरोधात महेश कदम या रिक्षा चालकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार परीक्षा न देता बी.कॉमची डिग्री तीन लाखांत देण्यासंदर्भात मुखेकर आणि त्यांचा संवाद झाला होता. दरम्यान पदवीसाठी दीड लाख रुपये देण्याचे मंजूर झाले होते. त्यातील काही रक्कम कदम यांनी मुखेकर यांना दिली होती. त्यानंतर कदम यांना पदवीचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले. परंतु यातील नावावरून हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले आहे.

SPPU Fake Degree
Gym Personal Training Refund: पर्सनल ट्रेनिंग न दिल्याने जीमला दणका; ग्राहकाला परतावा व नुकसानभरपाईचे आदेश

दरम्यान विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार विद्यापीठाकडे एका विशिष्ट विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्र व पदवी संदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. सदर तक्रारीत विद्यापीठाच्या नावाने गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे बनावट तयार करण्यात आल्याचे नमूद केले आहे. तसेच, या प्रकरणासंदर्भात संबंधित विद्यार्थ्याची आर्थिक फसवणूक झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. संबंधित प्रकरणाची विद्यापीठ प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली असून, यातील सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यासाठी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या आदेशान्वये एका सत्यशोधन समितीचे गठन करण्यात आले आहे. संबंधित समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, त्यातील तथ्ये व शिफारशींनुसार पुढील आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

SPPU Fake Degree
Pune Towing Drive: पुण्यात टोइंग कारवाईवर पुन्हा प्रश्नचिन्ह; पोलिस आयुक्तांच्या एसओपीकडे दुर्लक्ष?

काय आहे बनावट पदवीचे प्रकरण?

रिक्षाचालक कदम आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणाची माहिती घेण्यासाठी विद्यापीठात गेल्यानंतर वित्त व लेखा विभागातील रमेश मुखेकर यांनी काही साथीदारांसह तब्बल तीन लाख रुपयांत बी.कॉमची पदवी मिळवून देण्याची ऑफर दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या व्यवहारानंतर कदम यांना बी.कॉमचे दोन पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ऑफ पुणे या नावाने पहिले, तर दुसरे पदवी प्रमाणपत्र युनिव्हर्सिटी ऑफ पुणे या नावाने देण्यात आले आहे. या दोन्ही नावांनी विद्यापीठ पदवी देत नसल्याने कदम यांच्या मनात संशय निर्माण झाला. कारण विद्यापीठाचे अधिकृत नाव 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ'आहे. त्यातच वेगवेगळ्या वर्षांची आणखी चार पदवी प्रमाणपत्रे दाखवण्यात आल्याने हा प्रकार संशयास्पद असल्याची त्यांची खात्री झाली. यानंतर कदम यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती विद्यापीठ प्रशासनाला दिली. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. परंतु विद्यापीठ प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा खळबळ‍जनक आरोप देखील कदम यांनी केला आहे.

विद्यापीठाच्या कर्मचाऱ्याने बनावट गुणपत्रिका आणि पदवी तयार करून दिली असा आरोप असणारी तक्रार प्राप्त झाली आहे. त्याची सत्यता व व्याप्ती तपासून पाहण्यासाठी चौकशी समिती गठित केलेली आहे. दोषी असणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कडक कारवाई केली जाईल.

डॉ. प्रफुल्ल पवार, प्रभारी कुलसचिव सावित्रीबाई फुले पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news