Pune Baramati Cycling Competition: अजितदादा पवार जयंतीनिमित्त पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; देशभरातील 425 स्पर्धकांचा सहभाग

शनिवारवाड्यावरून स्पर्धेचे उद्घाटन; खा. सुनील तटकरे यांचा विश्वास—पुणे जिल्हा शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेईल.
Pune Baramati Cycling Competition
Pune Baramati Cycling CompetitionPudhari
Published on
Updated on

राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा, शिक्षण या विविध क्षेत्रात अजितदादा पवारांनी दिलेले योगदान अतुलनीय असून त्यांच्या अकाली जाण्याने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रखर इच्छाशक्ती, सहनशीलता, दूरदृष्टीने कार्याचा ठसा उमटवला. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची वाटचाल गौरवास्पद आहे . येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत दादांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ चालवेल, असा ठाम विश्वास महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

Pune Baramati Cycling Competition
Maharashtra Agricultural Marketing: मोठी कारवाई! राज्यातील ४० थेट पणन परवानाधारक आणि ७ खासगी बाजारांना कारणे दाखवा नोटीस

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे भूतपूर्व अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने आयोजित पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्य स्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारवाडा येथे खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते.

Pune Baramati Cycling Competition
Maharashtra Pharmacy College Ban: फार्मसी कॉलेज वाढीला पाच वर्षांचा ब्रेक; २०३० पर्यंत नवीन बी. फार्मसी, डी. फार्मसी महाविद्यालयांना परवानगी नाही

याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष मा. राजेश पांडे, विधानसभा सदस्य आ. बापूसाहेब पठारे, आ. शंकरभाऊ आल्हाट, माजी आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे शहर अध्यक्ष मा. सुनील टिंगरे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी शहराध्यक्ष मा. कविता आल्हाट, आजीव सदस्य मा. अशोक खळदकर, मा. के. टी. सोनवणे यांच्यासह पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा. राजेंद्रजी घाडगे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

Pune Baramati Cycling Competition
Maharashtra Mid Day Meal Rice Shortage: शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी पोषण आहाराचा तांदूळ गायब; ग्रामीण विद्यार्थ्यांची उपासमार

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविकात मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्य स्तरीय सायकल स्पर्धेचे हे दहावे वर्ष असून पुणे ते हडपसर पर्यंत सायकल रॅलीचे आयोजन केले असल्याचे नमूद करत सध्या आरोग्य, वाहतूक, पर्यावरण व स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असल्याकडे लक्ष वेधले.

Pune Baramati Cycling Competition
Khed Shivapur Police Chowki Cash Case: खेड शिवापूर पोलिस चौकीत २० लाखांच्या रोकड प्रकरणाचा पर्दाफाश; महिला हवालदार व तोतया पत्रकारावर संशय

तसेच सदर रॅलीमध्ये सामाजिक बांधिलकेच्या जाणिवेतून पर्यावरण संदेश, प्लास्टिक मुक्त परिसर प्रदूषण, स्वच्छता, वाहतूक याबाबत जनतेला संदेश देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थी, शिक्षक, प्रतिष्ठीत नागरिक व जेष्ठ नागरिक यांच्यासाठी खुल्या या रॅलीमध्ये भर पावसात सुमारे ३५०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी आपला सक्रीय सहभागी झाले आहेत. या स्पर्धेसाठी देशभरातील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ४२५ स्पर्धक सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी आमदार विलास लांडे यांनी केले.

logo
Pudhari News
pudhari.news