पुणे : सेल्फी काढताना इंद्रायणी नदीत पडलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

पुणे : सेल्फी काढताना इंद्रायणी नदीत पडलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
Published on
Updated on

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : सेल्फी काढताना इंद्रायणी नदीत पडलेल्या तरुणाचा मृतदेह रविवारी (दि.१७) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सापडला. अमित मिश्रा (वय १८, इंदिरा कॉलेज परिसर, चिंचवड) असे त्‍याचे नाव आहे.

तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.१६) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पाच मित्र कुंडमळा येथे फिरण्यासाठी आले होते. या ठिकाणी सेल्फी काढत असताना अमित मिश्रा हा पाय घसरून इंद्रायणी नदीत पडला. त्याचा शोध घेण्यासाठी लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथकाने शोध मोहीम राबविली. कुंडमळा येथील नदीपात्रामध्ये असलेले रांजणखळगे व जलपर्णीमुळे शोधकार्यात अडथळा येत होता. रविवारी (दि.१७) पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. अखेर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अमितचा मृतदेह सापडला. तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news