गोवा : औषधे घेण्यास सांगितल्‍याने मनोरुग्ण महिलेकडून वडिलांचा खून | पुढारी

गोवा : औषधे घेण्यास सांगितल्‍याने मनोरुग्ण महिलेकडून वडिलांचा खून

मडगाव : पुढारी वृत्तसेवा : औषधे घेण्‍यास सांगणार्‍या वडिलांचा मनोरुग्ण महिलेने खून केला. ही घटना बांदार आंबेली येथे आज (रविवार) पहाटे घडली. फिदेरीस कार्डोस (वय ७६) असे मयत वडिलांचे नाव आहे. या प्रकरणी मारियानी कार्डोस (वय ५०) हिला अटक  केली आहे. मुलीकडून जीवाला धोका असल्याने मारियानी हिची आई आपल्या बहिणीकडे गेली होती. याचवेळी तिने  वडिलांना काठीने मारहाण करुन त्यांचा खून केला.

एलआयसीमधील २० टक्क्यांपर्यंतच्या एफडीआयसाठी ‘फेमा’ कायद्यात सुधारणा

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मारियानी मनोरुग्ण होती. तिच्यावर उपचार सुरू होते. बऱ्याच दिवसांपासून तिने औषध घेतले नव्हते. औषधे घेण्यासाठी दबाव टाकणाऱ्या वृध्द आईला तिने शनिवारी मारहाण केली होती. त्यानंतर तिची आई पावलीना जवळच असलेल्या आपल्या बहिणीच्या घरी निघून गेली होती.

आज पहाटे  वडील फिदेरीस यांनी मारियानी हिला  औषध घेण्‍यास सांगितले. यावरुन वाद झाला. तिने काठीने मारहाण करत वडिलांचा खून केला. यानंतर मारियानी  जवळच असलेल्या नदीत जाऊन बसली होती. हा प्रकार स्थानिक लोकांच्या निदर्शनास येताच पाण्यातून तिला बाहेर काढण्यात आले. यानंतर तिला कुंकळी पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. कुंकळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पन्हाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुंकळी पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button