कोळशाच्या तुटवड्याबाबत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले," राज्‍य सरकार..." | पुढारी

कोळशाच्या तुटवड्याबाबत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले," राज्‍य सरकार..."

बारामती ; पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्यामुळे विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. त्‍यामुळे राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार परदेशातून कोळसा आयात करत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी पवार म्हणाले, राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून विजेचा तुटवडा जाणवत आहे. यासाठी राज्य सरकार परदेशातून कोळसा आयात करत आहे. बाहेरील कोळसा राज्यातील पॉवर पॉईंटला जास्तीच्या प्रमाणात चालत नाही. मात्र परदेशी आणि देशी कोळसा वापरून विजेचे संकट दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

पवार पुढे म्हणाले की, राज्यात ३ ते ४ हजार मेगावॉट विजेची मागणी वाढली आहे. विजेची मागणी लक्षात घेता शेजारील राज्यातून वीज विकत घेण्याचा निर्णय झाला आहे.

धरणातील पाणी पाऊस पडेपर्यंत शेतीला राखून ठेवण्यात येणार असून उर्वरित पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले जाणार आहे. तसेच आपण जी वीज वापरतो त्याचे बिल भरलेच पाहिजे, असेही ते म्‍हणाले.

Back to top button