Pune Solapur Road Redevelopment: पुणे-सोलापूर रस्ता व शिवरकर रोड विकास प्रकल्पाला गती

स्थायी समितीकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीला मंजुरी; रस्त्यांचे आधुनिकीकरण आणि जलवाहिनी कामांना चालना
Development Work
Development WorkPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीतील कॅन्टोन्मेंट कार्यालय ते भैरोबा नालादरम्यानच्या पुणे-सोलापूर रस्त्याच्या पुनर्बांधणीसह शिवरकर मुख्य रस्त्याच्या विकास प्रकल्पाला गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) नियुक्त करण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

Development Work
Pune Water Supply Project: GBS प्रभावित 12 गावांसाठी 890 कोटींच्या पाणी योजनेला गती

गुणवत्ता आणि खर्च आधारित निवड प्रक्रियेनंतर मे. स्ट्रक्टसोर्स इंजिनीअरिंग सोल्यूशन्स या संस्थेची सल्लागार म्हणून निवड केली आहे. या अंतर्गत पुणे-सोलापूर रस्त्याचे पुनःडांबरीकरण, पावसाळी जलवाहिन्या व रस्त्याचे आधुनिकीकरण, शिवरकर मुख्य रस्त्याचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे.

Development Work
Balgandharva Award 2026: बालगंधर्व पुरस्कार 2026: ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत काळे यांचा सन्मान

प्री-टेंडर आणि पोस्ट-टेंडर प्रक्रिया तसेच प्रत्यक्ष कामांवर तांत्रिक देखरेख ठेवण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमण्याची प्रक्रिया पथ विभागाने राबवली. या प्रकल्पासाठी आमदार सुनील कांबळे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे भिमाले यांनी सांगितले.

Development Work
Pune School Bus Fitness Check: पुणे RTOचा निर्णय; दर रविवारी स्कूल बस फिटनेस तपासणी

अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार स्ट्रक्टसोर्स संस्थेचे पीएमसी म्हणून नियुक्ती व त्यांच्या दरानुसार करार करण्यास मंजुरी देण्यात आली.

Development Work
Pune Rainfall: पुण्यात जून महिन्यात पावसाची मोठी तूट; 1958 नंतर दुसऱ्यांदा अत्यल्प पाऊस

निविदा प्रक्रियेत घेतला होता, दहा संस्थांनी सहभाग

निविदा प्रक्रियेत एकूण दहा संस्थांनी सहभाग घेतला होता. तांत्रिक छाननीनंतर तीन संस्था पात्र ठरल्या. त्यानंतर गुणवत्ता आणि खर्च आधारित निवड पद्धतीनुसार गुणांकन करण्यात आले. महापालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात गुणवत्ता तपासणी व तज्ज्ञ सल्लागार शुल्कासाठी संबंधित बजेट कोडवर तीन कोटी रुपयांची तरतूद केली असून, त्यातून या सल्लागाराची फी अदा केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news